ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

निकृष्ठ धान्य पुरवठ्याचा भाकपकडून तीव्र निषेध:तहसीलदारांना दिले निवेदन, गहू खाण्यास चांगला नसून तांदळामध्ये बारीक चुरी, भुकटी मिश्रीत कण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना पुरविण्यात आलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान खाण्यायोग्य धान्य मिळावे, या मागणीसाठी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. भाकप चे तिवसा तालुका सचिव कॉ.प्रकाश सोनोने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्र व राज्य सरकार गरीब आणि निराधार जनतेला अन्नावाचून कोणी राहु नये, प्रत्येकास उपजिविका करता यावी, या उदात्त हेतूने प्रतिमानसी प्रतिमाह तीन किलो तांदूळ व दोन किलो गहु देत आहे. सध्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी पुरविण्यात आले आहे. मात्र यावेळचे गहू-तांदुळ हे खाण्यायोग्य नसल्याने भाकपने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्यामते हे धान्य एवढे खराब दर्जाचे आहे की ते लाभार्थ्यांना आहारात घेणे महा कठीण झाले आहे. गहु हा खाण्यास चांगला नसुन तांदुळ मध्ये बारीक चुरी व भुकटी मिश्रीत आहे. सदर पुरवठा करणारा ठेकेदार,व त्यावर नियंत्रण करणारे पुरवठा अधिकारी यांची मिली भगत असल्याचे यामधून स्पष्ट होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाऊन सुधारित धान्य पुरवले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये होत असलेली दर वाढ व मिळण्यास होत असलेली चणचण याचाही निषेध नोंदविण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर