ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भाजप प्रवेश सोहळ्यावरून नाशिकमध्ये वाद:देवयानी फरांदेंचा विरोध डावलून माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांच्या हाती कमळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय पक्षांतरांना वेग आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपने ‘इनकमिंग’चा धडाका लावत विरोधी पक्षांतील अनेक बड्या मोहऱ्यांना आपल्या गळाला लावले. मात्र, या पक्षप्रवेशावरून नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांचा तीव्र विरोध डावलून हा सोहळा पार पडला. फरांदे यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज नाशिकमधील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात प्रामुख्याने उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांचा समावेश आहे. स्थानिक नेतृत्वाचा ‘बंडाचा’ झेंडा या मोठ्या पक्षप्रवेशांमुळे भाजपची ताकद वाढणार असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र अस्वस्थता आहे. विशेषतः माजी महापौर यतीन वाघ यांच्या प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांचा कडाडून विरोध होता. देवयानी फरांदे या नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रमुख आहेत, तरीही त्यांच्या शब्दाला डावलून हे पक्षप्रवेश झाल्याने त्यांनी सोहळ्याला दांडी मारली. त्यांच्यासोबतच अनेक जुन्या कार्यकर्त्यांनीही या ‘इनकमिंग’बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वी नाशिक भाजप कार्यालयाबाहेर हाय वोलेटेज ड्रामा पहायला मिळाला. या दोघांना पक्षात घेण्यासासंबंधी माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं देवयानी फरांदे यांनी म्हटलं कोणत्याही परिस्थितीत हा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही अशी भूमिका देवयानी फरांदे यांनी घेतली होती. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांना भाजपत घेतल्यास स्थानिक कार्यकर्त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्ष प्रवेशाला विरोध होत आहे. दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाविराधोत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर घोषणाबाजी देखील केली होती. मात्र, हा सगळा विरोध डावलून पाच नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. सगळ्यांनाच तिकीट मिळणार नाही – गिरीश महाजन स्थानिक नेत्यांच्या नाराजीवर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले की, “अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाराजी होणे स्वाभाविक आहे. मात्र, पक्ष वाढवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. देवयानी फरांदे यांचा विरोध लवकरच मावळेल.” यावेळी महाजन यांनी पक्षप्रवेश करणाऱ्यांना स्पष्ट इशाराही दिला. ते म्हणाले, “आज ७-८ बड्या नेत्यांनी प्रवेश केला असला, तरी पक्षात प्रवेश म्हणजे तिकीट मिळेलच असं नाही. पक्ष सर्वांच्या कामाचा आढावा घेऊनच निर्णय घेईल.” राजकीय समीकरणे बदलणार? मुंबईत ठाकरे बंधू (शिवसेना-मनसे) आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना, नाशिकमध्ये भाजपने विरोधकांचे बालेकिल्ले फोडण्याची रणनीती आखली आहे. मात्र, नव्यांच्या एन्ट्रीमुळे जुन्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्यास निवडणुकीत भाजपला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर