ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अशोक खरात प्रकरणाचे पडसाद परदेशातही:नायजेरियासह अनेक देशांत व्हिडिओंचा प्रसार, सायबर पोलिसांची मोठी कारवाई

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रांचा प्रसार परदेशातही झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या अनेक खात्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. 406 हून अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या तपासात अशोक खरात प्रकरणाशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणारे तब्बल 74 टेलिग्राम ग्रुप्स आणि विविध सोशल मीडिया अकाउंट्स आढळून आले आहेत. या माध्यमांतून व्हिडिओ आणि छायाचित्रे मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत इंटरनेटवरील अशा पोस्ट हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 406 हून अधिक आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो हटवण्यात यश आले आहे. तसेच 11 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या असून अनेक खात्यांकडून आवश्यक माहिती मागवण्यात आली आहे. तपासादरम्यान काही टेलिग्राम ग्रुप्सवर हे व्हिडिओ अवघ्या 20 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचाही धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. असे व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन या प्रकरणाची व्याप्ती केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित नसल्याचेही तपासात समोर आले आहे. संबंधित व्हिडिओंचा प्रसार भारतातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह युएई, श्रीलंका, फिलिपाईन्स आणि नायजेरिया या देशांपर्यंत झाल्याचे सायबर पोलिसांनी नमूद केले आहे. दरम्यान, नागरिकांनी असे व्हिडिओ डाउनलोड, शेअर किंवा खरेदी करू नयेत, तसेच संशयास्पद लिंक अथवा ग्रुप आढळल्यास तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात एल्गार!:सतेज पाटील-राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. कोल्हापुरात आज (९ जून) शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करणार आहेत. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून, हजारो शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर