ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

विठ्ठल नामाचा गजर करीत दिव्यांग वारकऱ्यांची दिंडी हिंगोलीत दाखल:ठिकठिकाणी स्वागत, ता. 23 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दिव्यांग संघ वाशिम यांच्या वतीने आयोजित संत सूरदास महाराज दिव्यांग वारीला वाशिम येथून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रारंभ झाला असून विठ्ठल नामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीचे हिंगोली जिल्हयातील गोरेगाव येथे शनिवारी ता. 20 स्वागत करण्यात आले. या दिंडीचे यावर्षी दुसरे वर्ष असून भक्तीभावामध्ये शारीरिक व्यंग आड येत नाही हे या दिव्यांग भाविकांनी दाखवून दिले आहे. आषाढीवारी निमित्त देशभरातून वारकरी पंढरपूरला जातात. गोवागावातून जाणाऱ्या दिंड्या, पालखी सोहळे यामुळे वातावरण धार्मिक होते. या दिंडी सोहळ्यामध्ये मागील वर्षापासून सुरु झालेल्या संत सूरदास दिव्यांग वारीने अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील वर्षी पहिल्यांदाच सुरू झालेल्या या दिंडीला भाविकांकडून आणि समाजातील सर्व स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदा दुसऱ्या वर्षीही अधिक आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने दिव्यांग बांधव पंढरीच्या वाटेवर निघाले आहेत. टाळ-मृदंगाच्या निनादात वाशिम येथून निघालेल्या या दिंडीचे मार्गावरील गावागावांत नागरिकांकडून जंगी स्वागत केले जात आहे. दिव्यांग वारकऱ्यांची जिद्द आणि भक्ती पाहून अनेकांचे डोळे पाणावत आहेत.

या दिंडीत प्रवीण कठाळे, बालाजी तपासकर, फकीरा भालेराव, पंजाब जामकर, युवराज गेडाम, विनायक मस्के, अर्चना मस्के, सोमनाथ अफुने, दुर्गा अफुने, निलेश उईके, वेंकट आळे, गुड्डू अंबुडारे, अंकित कोसरे, अलका कठाळे, लक्ष्मी पाणबुडे, पुष्पाबाई भालेराव, यमुनाबाई जामकर, इंदुबाई तायडे, श्रीराम भालेराव आणि सदानंद तायडे या दिव्यांग भाविकांचा सहभाग आहे. या दिंडीचे गोरेगाव येथे स्वागत करण्यात आले आहे. अपंगत्व हे भक्तीच्या आड येऊ शकत नाही, हा संदेश देत ही दिंडी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहे. दिव्यांगांची दिंडी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या या वारीने समाजासमोर इच्छाशक्ती, जिद्द आणि भक्तीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. दिंडी ता. 23 जुलै रोजी पंढरपूरात पोहोचणार वाशीम येथून निघालेली दिंडी ता. 23 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार असून ठिकठिकाणी दिंडीचा मुक्काम असणार आहे. याध्ये ता. 22 जून इडोळी, ता. 23 हिंगोली, ता. 24 हिंगोली औद्योगिक वसाहत, ता. 25 हिवराजाटू, ता. 26 गलांडी, ता. 27 नागेशवाडी, ता. 28 बारशिव, ता. 29 हट्टा, ता. 30 नांदगाव येथे मुक्कामी राहणार आहे. ता. 1 जुलै कारेगाव (परभणी), ता. 2 तरोटाफाटा, ता. 3 दैठणा, ता. 4 मुळे, ता. 5 बनपिंपळा, ता. 6 उकडगाव, ता. 7 कन्हेरवाड, ता. 8 वरवटी, ता. 9 आंबाजोगाई, ता. 10 पळसखेडा, ता. 12 सुकळी, ता. 13 कळम, ता. 14 मस्सा, ता. 15 येरमाळा, ता. 16 धानोरे, ता. 17 बार्शी, ता. 18 रिधोरे, ता. 19 माढा, ता. 20 वडाचौरी बुद्रूक, ता. 21 आरण, ता. 22 रोपळे येथे मुक्काम करून ता. 23 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर