ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

जुन्या गाड्या वापरणे आता महागणार!:पर्यावरण कर होणार दुप्पट; महाराष्ट्र मोटर वाहन कर (सुधारणा) विधेयक एकमताने मंजूर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र विधिमंडळात आज ‘महाराष्ट्र मोटर वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026’ एकमताने मंजूर केले असून, यामुळे राज्यातील जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विधेयकाची माहिती देताना स्पष्ट केले की, वाढत्या वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासोबतच पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या नवीन सुधारणेनुसार, दुचाकी वाहनांसाठीचा पर्यावरण कर 2000 रुपयांवरून 4000 रुपये, पेट्रोल वाहनांसाठी 3000 रुपयांवरून 6000 रुपये, तर डिझेल वाहनांसाठी 3500 रुपयांवरून 7000 रुपये इतका वाढवण्यात आला असून, हा कर दर पाच वर्षांसाठी एकरकमी भरावा लागणार आहे. या सुधारित कर रचनेमुळे राज्य सरकारला वर्षाला अंदाजे 160 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. हा सर्व निधी रस्ता सुरक्षा, अद्ययावत परिवहन सुविधा, एटीएस प्रणालीचे बळकटीकरण आणि संबंधित प्रशिक्षणासाठी विनियोग करण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा देत क्रेन वाहनांवरील मोटार वाहन करासाठी 30 लाख रुपयांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्यातील बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे. या विधेयकामुळे नागरिकांना बीएस-6 आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळणार असून, त्यातून ग्रामीण व आदिवासी भागांत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न पडता उलट महसुलात वाढ होणार आहे. सर्वपक्षीय सदस्यांनी या विधेयकाला एकमताने मंजुरी दिल्याने महाराष्ट्राच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त बहार पडणार नसून उलट महसूल वाढीस मदत होणार आहे. सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत करत एकमताने मंजूरी दिली, त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत सरनाईकांनी व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर