ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण:भाजप उमेदवाराला 2 दिवसांची, तर तीन आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या इतिहासात एखाद्या अधिकृत उमेदवाराला हत्येच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी मिळण्याची ही पहिलीच वेळ असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोलापुरातील जोशी गल्ली येथे शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून भाजपच्या दोन गटांत जोरदार वाद झाला. भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे आणि बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांच्या कुटुंबात हा संघर्ष झाला. या वादाचे पर्यावसान हत्येत झाले असून, यात बाळासाहेब सरवदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अटकेत असलेल्या भाजप उमेदवार शालन शिंदे यांना 2 दिवसांची, तर आतिश शिंदे, अमर शिंदे आणि तानाजी शिंदे या तीन आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी प्रथम वर्ग न्यायदांडाधिकारी श्रीमती एम. पी. मर्ढेकर यांनी सुनावली आहे. डोळ्यात चटणी टाकून केले वार मयत बाळासाहेब यांचे बंधू बाजीराव सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना अत्यंत क्रूरपणे घडवण्यात आली. तक्रारीत नमूद केल्यानुसार, भाजप उमेदवार शालन शिंदे यांनी बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने भीषण वार केले. विविध कलमान्वये गुन्हा दाखल याप्रकरणी सोलापूरच्या जेलरोड पोलिस ठाण्यात 15 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि इतर कायद्यांनुसार कठोर कलमे लावली आहेत. बीएनएस कलम 103, 109, 189 (1),(2), 190, 191(2),(3), 49, 352, 351(2), शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भाजप आमदारावर गंभीर आरोप या हत्याकांडाचे पडसाद राजकीय स्तरावर उमटले असून, मनसे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते प्रशांत इंगळे आणि माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी या प्रकरणाचा सूत्रधार भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे सोलापुरातील भाजपपुढील अडचणीत मोठी वाढ झाली आहे. हे ही वाचा… ‘बिनविरोध’साठी मनसेच्या पदाधिकाऱ्याचा मर्डर:आता ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा दावा होईल, खासदार प्रणिती शिंदे संतापल्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. पण आता ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा दावा केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर