ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

खरातची जागा आणि आवारेचे दुकान!:भोंदू अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारेंचा नवा गौप्यस्फोट, नामकर्ण आवारेंवर थेट निशाणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अशोक खरात प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात विरोधकांकडून सरकारवर दबाव निर्माण करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा नवे गौप्यस्फोट केले आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या, दीपक केसरकर यांना सगळे माहीत आहे की अशोक खरातला कोण कोण पोसत आहे. त्यांना आव्हान आहे की या सगळ्या प्रकरणात तुम्हाला माहीत असून या सगळ्या संबंधाने माहिती देत नसाल आणि माझे नाव आले तर मी इतरांचे नावे घेईल, तर याचा अर्थ तुम्ही इतर गुन्हेगारांना लपवून ठेवत आहेत. हे कोण 39 लोक आहेत, त्यांची नावे उघड केली पाहिजेत. केसरकर असे म्हणतात की, मी एकटा गेलो नव्हतो, माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते. याचा अर्थ अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध आहेत, असे केसरकर सांगू इच्छितात का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. नामकरण आवारे ही महत्त्वाची कडी पुढे बोलताना सुधमा अंधारे म्हणाल्या, नेमके या सगळ्यात त्यांना सूचित काय करायचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आम्ही एसआयटीला भेटून सांगितले होते की, शिवनिकाची सर्व सदस्यांची चौकशी झाली पाहिजे. यात प्रामुख्याने 3 नावे आहेत. ज्यात एक नाव आहे चाकणकर, नामकर्ण आवारे आणि ललित पोफळे. नामकरण आवारे ही महत्त्वाची कडी आहे. ती का महत्त्वाची आहे त्याचे कारण म्हणजे आवारे हा भाजप उद्योजक आघाडीचा सरचिटणीस आहे. पण सध्या त्याचे भाजपसोबत कनेक्शन दिसत नाही. खरातची भोंदुगिरी वाढवण्याचे कॅम्पेन आवारेनेच केले सुधमा अंधारे म्हणाल्या, कॅप्टन खरात हा जगदंब पथसंस्थेचा 2018 ते 2024 या काळात चेअरपर्सन होता. या पथसंस्थेचा सर्वेसर्वा हा आवारे आहे. पुढे तीन अपत्य असल्याने सहकारी संस्थेचा चेअरपर्सन होता येत नाही असे म्हणत चेअरमनशिप काढण्यात आली होती. 15 वर्षांपासून हा जो आवारे आहे शिवनिका संस्थेवर संचालक होता. म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात, या डोंघात आर्थिक हितसंबंध आहेत. आता हे दोघे वेगळे झाले असले तरी खरातची भोंदुगिरी वाढवण्याचे कॅम्पेन आवारेनेच केले होते. आवारे हा त्या काळात स्टाइसचा मेंबर होता. स्टाइस म्हणजे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहत संस्था. या संस्थेत जे 400 उद्योजक आहेत, त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते. या 12 पैकी एक खरात होता. बुवाबाजी वाढवण्याचे काम पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील तर आवारे लगेच सांगायचा खरात गुरुजींना हात दाखवता का? पत्रिका दाखवता का? असे करत एक एक उद्योजक खरात पर्यंत पोहोचवण्याचे काम आवारेने केले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने जे पुस्तक लिहिले आहे, त्या पुस्तकात 18 पाने आहेत, ती वाचली तर लक्षात येईल की, आवारेने खरात कसा सिद्ध पुरुष आहे, हे सांगणाऱ्या कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचे काम त्याने केले. आवारे आणि खरात सारखेच पापाचे भागीदार सुधमा अंधारे म्हणाल्या, नामकर्ण आवारेने वेगवेगळ्या यूट्यूबरला सांगून जे पर्यटनाचे ब्लॉग बनवतात त्यांच्याकडून हे मंदिर हेमाडपंथी आहे असा प्रचार सुरू केला. मुळात हेमाडपंथी मंदिर हे अष्टकोणी असते आणि इशान्येश्वर मंदिर अगदी आत्ता आलेले मंदिर, परंतु याला हेमाडपंथी ठरवणे, मोठमोठ्या नेत्यांची ऊठबस करणे, या सगळ्यात आवारेचा हात आहे. ललित पोफळे हा नंतरचा माणूस आहे. आता आवारे सांगतो की माझे 1 वर्षापासून खरातसोबत संबंध नाहीत. मग त्याने तेव्हाच खरात हा भोंदू आहे, खरात हा महिलांचे लैंगिक शोषण करतो, चुकीचे वागतो, ही गोष्ट आवारेने पुढे का आणली नाही? कारण आवारे आणि खरात सारखेच पापाचे भागीदार आहेत. चाकणकरांनी नेत्यांना अप्रोच करण्याचे काम केले सुधमा अंधारे म्हणाल्या, विशेष गोष्ट या तीर्थक्षेत्राला ‘क’ वर्गाचा दर्जा 2018 मध्ये मिळाला. 2018 ला मिळालेला दर्जा, आता वेबसाईटवर दिसत नाही. या खरातची जागा आणि आवारेचे दुकान अशी परिस्थिती आहे. दोघांचे आर्थिक व्यवहार अजूनही सुरू आहेत. 31 मार्च 2018 मध्ये या तीर्थक्षेत्राला ‘क’ दर्जा देण्याचे काम हे तेव्हाचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या काळात झाले आहे. या सगळ्यात आवारे सगळ्यांना अप्रोच करत होता. असेच त्याने चाकणकर यांनाही अप्रोच केले. आवारेनंतर चाकणकर साथीदार मिळाल्या. त्यांनी देखील प्रत्येक नेत्याला अप्रोच करण्याचे काम केले. जयकुमार रावल यांची देखील चौकशी झाली पाहिजे ही सगळी मंडळी जाणीवपूर्वक खरातला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि त्याचे प्रस्थ वाढवण्यासाठी मदत केली. यात चाकणकर यांचा मोठा सहभाग आहे. चाकणकर यांना सगळी परिस्थिती माहीत असताना गुन्हेगाराला पाठीशी घातले. आता त्या एसआयटीच्या चौकशीसाठी सामोरे का जात नाही? आता समजते की त्या महिला आहेत म्हणून प्रवास करता येत नाही, असे कारण त्यांनी दिले आहे. एसआयटी अजूनही रूपाली चाकणकरांना चौकशीला का बोलवत नाही? चाकणकरांना समान पाठवले, असे समजले. परंतु त्यांनी महिला असल्यामुळे मी प्रवास करू शकत नाही, असे म्हटले. मग तुम्ही दर 15 दिवसाला नाशिकला जात होत्या तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? आयोगाची सर्व महत्त्वाची कामे सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जायच्या, तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसे नव्हते का? हे असे उत्तर देत असतील तर एसआयटीचा अवमान आहे. अधिकाऱ्यांचा अवमान आहे. जयकुमार रावल यांची देखील चौकशी झाली पाहिजे. कोणत्या पुराव्याच्या आधारे पर्यटन दर्जा दिला? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तटकरे फॅमिली अत्यंत हुशार.. सुषमा अंधारे म्हणाल्या, चाकणकर यांचे यजमान नीलेश चाकणकर आणि आकाश चौधरीची प्रॉपर्टी एकत्रित आहे. हा आकाश चौधरी कोण आहे, तटकरे यांचा साथीदार आहे. यातली गंमत अशी आहे की तटकरे फॅमिली अत्यंत हुशार आहे. त्यांनी एकामागून एक कंपन्या स्थापन केल्या आहेत. आकाश चौधरीच्या मदतीने सगळे काम करतात. एक गीतामृत नावाची कंपनी आहे जी अदिती तटकरे आणि आकाश चौधरीच्या नावावर आहे. असे अनेक कंपन्या या दोघांच्या नावावर आहेत. गंमत अजून पुढे आहे. आता अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी या दोघांच्या नावावर सुद्धा अनेक कंपन्या आहेत. मी सगळे पुरावे देण्यास तयार ही सगळी कडी मला आता मुलुंडचे एचडी व्हिडिओ सपेशालिस्ट किरीट सोमय्या यांची मदत पाहिजे. किरीटजी तुमची आणि ईडीची फार ओळख आहे. तुम्ही फार कागदपत्र काढतात. आता आम्हाला पण मदत करा या लोकांच्या कंपन्यांचे कागदपत्र काढायला. ब्लॅक मनी व्हाइट करण्यासाठी त्यांच्या कंपन्या आहेत. यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. मी सगळे पुरावे देण्यास तयार आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर