ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

देशाचा ऐतिहासिक अन् धार्मिक वारसा संकटात:MVA चा भाजप सरकारवर आरोप; मणिकर्णिका घाट उद्ध्वस्त करण्याविरोधात केले धरणे आंदोलन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या उत्तर प्रदेशातील काशी येथील ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावर तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर बुलडोझर चालविण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार, 27 जानेवारी रोजी शहरात महाविकास आघाडीच्या वतीने मूक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या काळात देशाचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा संकटात सापडल्याचा आरोप करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 1771 मध्ये वाराणसी स्थित मणिकर्णिका घाटाचे निर्माण केले होते. त्यानंतर 1791 मध्ये या घाटाचे नुतनीकरण करून त्याला नवसंजीवनी दिली होती. हिंदू धर्मात येथे अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो व जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. त्यानंतर आता पुनर्विकासाच्या नावाखाली या घाटाचा काही भाग पाडण्यात आला आहे. यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीने मंगळवारी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथे सरकारच्या या कृतीचा निषेध केला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा अधिकार असो, अशा घोषणा देत अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले. कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात हे मुक धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारचे कृत्य अत्यंत निषेधार्ह – दानवे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ एका राज्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या आदर्श प्रशासक होत्या. त्यांच्या कार्याशी संबंधित ऐतिहासिक घाट आणि पुतळ्यावर बुलडोझर चालविणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून, भाजप सरकारचा बेगडी हिंदुत्वाचा चेहरा समोर आल्याची भूमिका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यावेळी मांडली. संविधान आणि महापुरुषांचा सन्मान करण्याचे नाटक करणाऱ्या भाजप सरकारकडून प्रत्यक्षात मात्र वारंवार ऐतिहासिक वारशावर घाव घातला जात आहे. अशा कारवायांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष भारताचा संपूर्ण ऐतिहासिक वारसा संपुष्टात आणण्याचे काम करत असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी करत निषेध व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सामाजिक कार्य आणि सुशासनाचे प्रतीक आहे. त्यांच्या स्मृतीस्थळांवर कारवाई करणे म्हणजे देशाच्या अस्मितेवरच घाव घातल्यासारखे असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील म्हणाले. याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, राज्य संघटक चेतन कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख युसूफ, वंचित बहुजन आघाडी नेते योगेश बन,रामेश्वर तायडे, प्रकाश मुगदिया, महेंद्र रमंडवाल, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, संतोष खेडके, किशोर कच्छवाह, अरविंद धिवर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, विष्णू जाधव, प्रमोद ठेंगडे, गिरीश चपळगावकर, अंजन साळवे,सचिन खैरे,गणेश लोखंडे,सुरेश गायके, संदेश कवडे, गौरव पुरंदरे,राजेंद्र दानवे सचिन वाघ, जयसिंग होलिये, रामेश्वर कोरडे, अजय चोपडे, बापू कवळे, शिवकुमार देशमुख, सुदर्शन छापोले, सिताराम सुरे, दीपक तांबे,सलीम खामगावकर, नितीन पवार, संजय हरणे, कल्याण चक्रनारायण, प्रितेश जैस्वाल, मनोज बोरा, डॉ. नाना पळवदे, विशाल खंडागळे, सुदाम पवार, हिरालाल वाणी, सोमीनाथ नवपुते, वसंत भाई शर्मा, मिलिंद बोरडे, गणेश खोतकर, कोमल हिवाळे, साधना पठारे, मुंजाभाऊ तूपसुंदरे, सुनील जोगदंड, संतोष दळे, पंकज बनसोडे, सचिन तांबे, कृष्णा नजन, किरण तांबे, संतोष रिठे, गणेश रोडगे, विनोद सोनवणे, संतोष तांबे, सागर तांबे,लखन तांबे, सागर तांबे, लक्ष्मण जोशी, दिनेश रिठे, विनोद लोखंडे,कुणाल राऊत, भागीनाथ रिठे, राजू रोठे, शेख कैसर बाबा, उमाकांत खोतकर, शिरीष चव्हाण,कुणाल पाठक, विनोद लोखंडे,अनिल काळे, राहुल पवार, संजय पेरकर सतीश लोखंडे,अभिषेक शिंदे पाटील, राहुल संत, रवी लोखंडे, सुनील साळवे, मुदस्सिर अन्सारी, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार, अरुणा भाटी, मीरा देशपांडे, राजश्री पोकळे, वैशाली कोरडे, दिपाली पाटील बोरसे, रूपाली मुंदडा,जयाबाई तांबे, अर्चना तांबे, सखुबाई नजन, शोभाबाई तांबे, ज्योती जगधने, इंदुबाई तांबे, कविता सोरमारे, योगिता सरोदे, माधुरी सोरमारे, लंका सोलाट, योगिता रीठे, संगीता रिठे, रंजना कोरडे, छाया सोरमारे, मंजू लोखंडे व अरुणा लांडगे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर