ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

श्वान चावल्याने तरुणाने दगड मारला, श्वानाचा मृत्यू:डोक्यात दगड घालणाऱ्या तरुणाविरुद्ध खडकी पोलिसात गुन्हा दाखल

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बोपोडी भागात श्वान चावल्याने एका तरुणाने दगड मारून श्वानाला ठार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलम शेख (वय 27, रा. तेली चाळ, जुना मुंबई-पुणे रस्ता, बोपोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. जीवन भीमसेन सोनवणे (वय 52, रा. तेली चाळ, जुना मुंबई-पुणे रस्ता, बोपोडी) यांनी याबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांनी ‘ऑगी’ नावाचे श्वान पाळले होते. या श्वानाने आरोपी तरुणाचा चावा घेतला होता. श्वानाने चावा घेतल्याने चिडलेल्या तरुणाने हे कृत्य केले. सोमवारी (15 जून) पहाटेच्या सुमारास तरुणाने सोनवणे यांच्या श्वानाच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सोनवणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. श्वानाच्या डोक्यात दगड घालून मारल्या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एन. गाडेकर पुढील तपास करत आहेत. गेल्या महिन्यात विश्रांतवाडी भागातही अशीच एक घटना घडली होती. सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानाने सफाई कामगाराचा चावा घेतला होता. त्यानंतर सफाई कामगाराने श्वानाला काठीने मारले होते, ज्यात श्वानाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एका प्राणीप्रेमी महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पुणे शहरात भटक्या शवनाचा वावर देखील वाढला असलेले विविध ठिकाणी शिवानाचा नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण वाढले असल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर