ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवा:आम्ही ओरिजनल गुंड, पोलिसांच्या जीवावर उड्या मारत नाही- संजय राऊत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एकनाथ शिंदे यांना ज्या शिवसेनेने मोठे केले आहे, तो पक्ष न्यायालयातून आम्हाला वापस द्यायला लावला पाहिजे. न्यायव्यवस्था विकत घेत तुमची दादागिराी सुरू आहे का? पोलिसांचा माफियासारखा वापर करत तुम्ही ही दादागिरी करत आहात. तुमच्याकडे यंत्रणा आहे म्हणून तुमची ही दादागिरीचा भाषा आहे, ज्या दिवशी हे नसेल त्या दिवशी ही भाषा करुण दाखवाच, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. यंत्रणेच्या जोरावर एखादा नपुंसक सुद्धा मी मर्द आहे असे ओरडून सांगतो. संजय राऊत म्हणाले की, भाऊसाहेब वाघचौरे नावाचे 75 कोटी रुपयांना विकले गेलेले खासदार आहेत त्यांना शिर्डीत यायचे म्हणून ते रस्ते बंद केले. अन् शेकडो शिवसैनिकांना शिर्डीतून बाहेरच्या पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. शिवसेना संपली म्हणता मग ही कसली भीती आहे. पोलिसांनी सुद्धा असे वागू नये. आम्ही ओरिजनल गुंड आहोत. पोलिसांच्या जीवावर गुंडगिरी करत नाही. मुख्यमंत्र्यांनी जनेतची माफी मागावी संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मराठी येत नाही त्यांनी मराठीचा अपमान केला आहे. त्यांना किंवा मुख्यमंत्र्यांनी जनेतची माफी मागितली पाहिजे. विरोधी पक्ष काय करतो आहे हा प्रश्न माझ्यापुढे पडला आहे. मी जर सभागृहात असतो तर मी त्यांच्या दिशेने पेपरवेट फेकून मारले असते. माझ्यासारखे अजून 10 लोकं असते तर जांबुवंतराव धोटे यांचे स्मरण करत मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात आवाज उठवला असता. ..तर मुंबईमध्ये फिरणं अवघड संजय राऊत म्हणाले की, प्रशासनाकडून पावसाळ्यात नवीन कामे काढण्यात आली आहेत मुंबईकरांनी प्रवास कसा करावा. तुमच्याकडे पोलिस आहेत पण सामान्य माणसांचे काय? आम्ही 25 वर्षे मनपा ताब्यात असताना पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे करत होतो, बैठका घेत होतो. पण मनपाने ते काहीच न केल्याने आता जर पाऊस झाला तर मुंबईमध्ये फिरणं अवघड होईल. आमच्या पक्षातून त्यांच्या पक्षात गेलेल्या खासदारांना गावी जाण्यासाठी विमानं देण्यात आली. गद्दार खासदारांना विमानाचा पास एकनाथ शिंदे यांनी काढून दिला आहे.

नार्वेकरांना शोक प्रस्ताव वाचता येत नाही संजय राऊत म्हणाले की, राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांना मराठी लिहीता, वाचता आणि बोलता येत नाही. मराठीत विचार करता येत नाही. हे नार्वेकर आहेत की युरोपातील रहिवासी आहेत? असा सवाल राऊत यांनी केला आहे. हे परकीय नागरिक तर नाहीत ना? रिक्षावाल्यांना मराठी आली पाहिजे असा कायदा तयार केला जातो, मराठीच सक्ती आहे असे मुख्यमंत्री सांगतात आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी येत नाही. त्यांना शोक प्रस्ताव वाचता येत नाही. ज्यांना मराठी येत नाही असा माणूस तिथे बसवला आहे, त्यांना परावरुन बाजूला केले पाहिजे. मराठी येत नाही म्हणून त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणलेले होते.
हा मराठीचा अपमान संजय राऊत म्हणाले की, रिक्षावाल्यांना मराठी येत नाही म्हणून आपण मारतो मग आता यांना मारायचे का? मराठी येत नसताना त्यांना विधानसभा अध्यक्षपदावर कोणी बसवले. ज्यांना मराठी येत नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा मराठीचा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा अपमान आहे. भाजपला लाज वाटली पाहिजे जर नार्वेकर यांनी माफी मागितली नसेल तर. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मग नार्वेकरांना मराठी का येत नाही. लोढांना किंवा इतरांना हे पद द्या. त्यांना पदावर बसवणे 106 हुतात्माचा अपमान आहे. तर ट्विट करत ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी है.. लडना है महाराष्ट्र के गद्दारो के खिलाफ होंसला है बुलंद सफर जारी है! असे राऊतांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर