ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

पेरणी हंगाम पूर्वीच आर्वीत बनावट बोगस बियाणे रॅकेटवर धाड:आर्वीत २९ लाखांचे बोगस बियाणे जप्त

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभाग आणि पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली आहे. आर्वी तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे एका गोदामावर छापा टाकून तब्बल २९ लाख ४६ हजार ८४६ रुपये किमतीचा एचटीबीटी (HTBT) बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ५२ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून, ऐन खरीप हंगामापूर्वी झालेल्या या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनधिकृत आणि बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला सातत्याने प्राप्त होत होत्या. महागडे बियाणे खरेदी करूनही अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत कृषी विभागाने संशयित गोदामांवर विशेष पाळत ठेवली होती. त्यानंतर, कृषी अधिकारी संजय बनसोडे यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत शिरपूर (बोके) येथील संजय मारोतराव गोपाळे (वय ५२) याच्या मालकीच्या गोदामावर धाड टाकली. या छाप्यात गोदामात मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेला बोगस एचटीबीटी बियाण्यांचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २९ लाख ४६ हजार ८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी संजय गोपाळे याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, हे बोगस बियाणे थेट गुजरातमधून आणले जात होते आणि येथे त्याचे बनावट पॅकिंग करून ते विक्रीसाठी बाजारात आणले जात होते. बोगस बियाण्यांच्या या आंतरराज्यीय रॅकेटची पाळेमुळे कुठपर्यंत रुजलेली आहेत आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. ही धडक कारवाई कृषी विभागाचे अधिकारी संजय बनसोडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर