ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

विठुरायाच्या भेटीसाठी निघाली सद्गुरू जगन्नाथ बाबांची पालखी:मारेगावात वारकऱ्यांचे स्वागत; रिंगण सोहळ्याने भक्तिरसाची उधळण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आषाढी वारीच्या पवित्र पर्वाला सुरुवात होताच सद्गुरू जगन्नाथ बाबांची पारंपरिक पालखी निर्जला एकादशीच्या शुभमुहूर्तावर वणी येथील नंदेश्वर देवस्थानातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाली. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघालेल्या या पालखी सोहळ्याने परिसर भक्तिमय झाला. वारकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ भाविक मोठ्या उत्साहाने पायी वारीत सहभागी झाले आहेत. “जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले असून अभंग, भजन आणि नामस्मरणाच्या साथीने वारकरी विठुरायाच्या भेटीची ओढ मनात घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहेत. पालखीचे मारेगाव शहरात आगमन होताच विविध सामाजिक संस्था, व्यापारी, नागरिक आणि भाविकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. पुष्पवृष्टी, आरती आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील मुख्य मार्ग भगव्या पताकांनी आणि वारकऱ्यांच्या उत्साहाने फुलून गेला. सायंकाळी मार्डी चौकात पालखीचे आगमन झाल्यानंतर वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी काही अंतर पालखीसोबत पायी चालत वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी संत परंपरेचे जतन करणाऱ्या वारकऱ्यांचे कौतुक करत सर्वांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या. रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पालखीचा मुक्काम झाला. यावेळी पार पडलेल्या पारंपरिक रिंगण सोहळ्याने भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. टाळ-मृदंगाच्या गजरात धावणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह, हरिनामाचा अखंड नाद आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण पाहण्यासाठी मारेगावसह परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. सद्गुरू जगन्नाथ बाबांची पालखी आता पुढील प्रवास करत आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे. संतपरंपरा, भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही वारी आजही लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि अध्यात्मिक ऊर्जेचा अविरत प्रवाह म्हणून कायम आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर