ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे आरक्षण उप-वर्गीकरणाबाबत जनजागृती:नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचेही वाटप, एकजूट दाखवण्याची वेळ‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्यावतीने रुक्मिणी नगर येथील सुयोग मंगल कार्यालयात अनुसूचित जातीच्या उप-वर्गीकरणासंदर्भात जनजागृती मोहिमेचे व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून सफाई कामगार बांधव आणि महिला भगिनी उत्स्फुर्तपणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत, दीपप्रज्वलन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वासुदेव चांगरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अत्यंत उत्साहात झाली. सरकारने संघटनेला सोबत घेऊन सामाजिक जनगणना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टांक यांनी केली. या जनजागृती मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील संघटनेचे अधिकारी, कार्यकर्ते, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि समाजसेवकांची एक संयुक्त बैठक पार पडली. यावेळी जिल्हा शाखा आणि इतर शाखेतील पदाधिकाऱ्यांची अधिकृत निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. “आम्हाला आरक्षण हवे’ अशा घोषणांनी संपूर्ण सुयोग मंगल कार्यालय आणि परिसर दुमदुमून गेला होता. या सभेला राष्ट्रीय सरचिटणीस जयसिंग कछवाह, राज्याचे अध्यक्ष श्रबाली मांडेपू, सरचिटणीस महतो, राहुल टांक, व गणेश तंबोले,सचिव जावडेकर व राठी, खजिनदार अशोक सारवण, जिल्हाध्यक्ष किशोर धामणे, उपाध्यक्ष राजा डेंडुले आणि सरचिटणीस राकेश पांडे यांच्यासह अखिल भारतीय सफाई मजूर संघाचे सर्व पदाधिकारी, समाजसेवक व कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव संजय मिलांदे यांनी केले, तर आभार जिल्हाध्यक्ष किशोर धामणे यांनी मानले. ऑल इंडिया सफाई मजूर युनियन अमरावतीतर्फे आयोजित हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धतेने आणि वेळेत पार पडला. ते म्हणाले की, आरक्षणाचे उप-वर्गीकरण झालेच पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण सामाजिक प्रगतीसाठी आणि उच्चपदस्थ अधिकारी वर्ग घडवण्यासाठी समाजातील अत्यंत मागासलेल्या व दुर्बळ घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणे गरजेचे आहे. यासाठी संपूर्ण समाजाने आता एकत्र येऊन एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर