ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

‘ऑपरेशन सिंदूर हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार’,

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अहिल्यानगर स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर राष्ट्ररक्षण, विज्ञाननिष्ठता आणि भारताच्या आधुनिक युद्धनीतीचा दूरदृष्टीने विचार करणारे युगपुरुष होते. त्यांनी मांडलेले ‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हे विचार आजच्या सशक्त आणि शस्त्रसज्ज भारताच्या रूपाने प्रत्यक्षात साकार होत आहेत. भारताने अलीकडे यशस्वीरित्या पार पडलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार आहे, असे प्रतिपादन निवृत्त मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांनी केले. विचार भारती आयोजित ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप मेजर गर्गे-कुलकर्णी यांच्या ‘सावरकरांच्या स्वप्नातील शस्त्रसिद्ध भारत’ या विषयावरील व्याख्यानाने झाला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पहलगाम येथे पाकिस्तानच्या धर्मांध दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला भारताने मुत्सद्देगिरी आणि ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाद्वारे घेतला, असे सांगून मेजर गर्गे म्हणाल्या, युद्ध कधी, कसे लढायचे आणि योग्य वेळी कोठे थांबायचे, याचा नवा आदर्श भारताने जगासमोर ठेवला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ मर्यादित लष्करी कारवाई नसून, दहशतवादा विरोधातील निर्णायक संघर्षाची नांदी आहे. सूडाच्या भावनेपेक्षा नियोजनबद्ध रणनीतीने भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. या सोहळ्यास महापौर ज्योती गाडे, उद्योजक अश्विन गांधी, रा.स्व.संघाचे माजी जिल्हा संघचालक डॉ. रवींद्र साताळकर, जनजाती कल्याण आश्रमचे प्रांत पदाधिकारी महेंद्र जाखेटे, विशारद पेटकर, दिनकर घोडके, अशोकराव गायकवाड, भावना लांडगे आदी उपस्थित होते. विचार भारतीचे मनोज झंवर यांनी पाहुण्यांचा परिचय दिला, तर नीता गांधी, सुनील नागोरी, नगरसेवक रवींद्र बारस्कर आदींनी पाहुण्यांचा सत्कार केला. दीड तास श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान माऊली सभागृहात सुमारे दीड तास मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांनी राष्ट्ररक्षण, सावरकरांचे विचार आणि आधुनिक युद्धनीती यांचा अत्यंत प्रभावी परामर्श घेतला. त्यांच्या अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि ओजस्वी मांडणीने उपस्थित शेकडो श्रोते भारावून गेले होते. व्याख्यानाच्या समारोपानंतर संपूर्ण सभागृह ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून त्यांना मानवंदना दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर