ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

आज जुळून आला ‘ब्ल्यू मून’चा योग:खगोलप्रेमींसाठी पर्वणी, अंधश्रद्धांपासून दूर राहण्याचे आवाहन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आकाश निरीक्षकांसाठी आणि खगोलप्रेमींसाठी हा रविवार विशेष ठरणार आहे. ३१ मे रोजी आकाशात दुर्मिळ ‘ब्ल्यू मून’ पाहण्याची संधी मिळणार असून, या महिन्यातील दुसरी पौर्णिमा असल्याने या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ असे संबोधले जाते. विशेष म्हणजे या घटनेचा चंद्राच्या रंगाशी कोणताही संबंध नसून, तो नेहमीप्रमाणेच दिसणार असल्याचे खगोल अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. मे महिन्याची पहिली पौर्णिमा १ मे रोजी झाली होती. पौर्णिमांमधील सरासरी अंतर सुमारे २९ दिवस १२ तासांचे असल्याने महिन्याच्या सुरुवातीला पौर्णिमा आल्यास त्याच महिन्याच्या शेवटी दुसरी पौर्णिमा येते. यालाच खगोलशास्त्रात ‘ब्ल्यू मून’ असे संबोधले जाते. त्यामुळे यंदाचा मे महिना खगोलीय दृष्टिकोनातून विशेष ठरत आहे. खगोल अभ्यासकांच्या मते, ब्ल्यू मून हा अत्यंत दुर्मिळ योग असून साधारणपणे दर ३० महिन्यांनी तो अनुभवायला मिळतो. यापूर्वी हा योग ३० ऑगस्ट २०२३ रोजी आला होता. आता पुन्हा रविवार, दि. ३१ मे रोजी तो दिसणार असून पुढील ब्ल्यू मूनसाठी ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ब्ल्यू मूनबाबत समाजात विविध समज-गैरसमज आढळून येतात. काही जणांना या दिवशी चंद्र निळ्या रंगाचा दिसेल अशी अपेक्षा असते. मात्र खगोलशास्त्रीयदृष्ट्य ा हा चंद्र इतर कोणत्याही पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणेच असतो. त्याच्या रंगात किंवा आकारात कोणताही विशेष बदल होत नाही. स्काय वॉच ग्रुप, यवतमाळच्या वतीने नागरिकांना या खगोलीय घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाशातील घटनांशी संबंधित अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हटले जाते. हा केवळ कालगणनेशी संबंधित प्रकार असून त्याचा चंद्राच्या रंगाशी किंवा स्वरूपाशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे ३१ मे रोजी चंद्र निळा दिसेल अशी अपेक्षा ठेवण्याचे कारण नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर