ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

दारव्हा एसटी आगारात महामंडळाचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा:ग्रामीण-शहरी प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७८ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एसटीच्या समृद्ध परंपरेचे स्मरण करत भविष्यातही प्रवाशांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यापार आणि सामाजिक संपर्क यांसाठी राज्यातील नागरिकांचा एसटीवर असलेला विश्वास कायम असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केला. “प्रवाशांची सेवा हीच आमची बांधिलकी” या ध्येयवाक्याला अनुसरून एसटी महामंडळाने राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एसटीने सातत्याने पार पाडले असून, अनेक पिढ्यांच्या आठवणींशी एसटीचे नाते जोडले गेले आहे. वर्धापन दिन कार्यक्रमात दारव्हा आगाराचे आगार व्यवस्थापक नितीन झाडे, कार्यशाळा अधीक्षक निकेश उघडे, वाहतूक अधीक्षक बाळकृष्ण मेश्राम, वाहतूक निरीक्षक सोनाली पवार, वाहतूक नियंत्रक भारती ढाले, कैलास धोटे, राजेश कारमोरे, वरिष्ठ लिपिक उमेश चव्हाण, लिपिक पवन इंगळे व प्रकाश काळे यांच्यासह आगारातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाहक सवणे, मिर्झा, पवार, बाखडे, पेठे आणि सिंहे यांनीही एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सेवेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. एसटी महामंडळाची ७८ वर्षांची वाटचाल ही केवळ प्रवासी वाहतुकीची कथा नसून महाराष्ट्राच्या विकास, प्रगती आणि लोकसेवेची प्रेरणादायी गाथा आहे. या गौरवशाली प्रवासाबद्दल अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी आनंद व्यक्त करत महामंडळाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर