ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

संत भीमा भोई यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज- नेमाडे:जयंतीतून समता, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांच्या विचारांचे जतन करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांनी समता, बंधुता आणि मानवतेचा विचार समाजात रुजवण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन भोई समाज संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सखाराम नेमाडे यांनी येथे केले. पुसद शहरातील गणेश वार्ड परिसरातील भोईपुरा येथे संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुसद नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती राजेश साळुंखे, नगरसेवक अक्षय महाकाळ, मारोती भस्मे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू गुद्दटवार, समाजसेवक दिलीपराव सोनोने, डॉ. संतोष बावणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल नेमाडे, अरुण बोरके, प्रकाश बोरके यांची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना सखाराम नेमाडे यांनी संत भीमा भोई यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेत गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांतून समाजात मानवता, समानता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत झाला, असे त्यांनी सांगितले. शेगाव येथील आनंदसागर परिसरात संत भीमा भोई यांच्यासह विविध संतांचे उभारण्यात आलेले भव्य स्मारक हे त्यांनी केलेल्या कार्याची मोठी दखल असल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आपल्या भाषणात संत भीमा भोई यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केल्याने भोई समाजाचा सन्मान वाढल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी समाजप्रबोधनासाठी पुढे येत संत भीमा भोई यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान समाजाच्या वतीने नगरसेवक राजेश साळुंखे, विविध मान्यवर तसेच दैनिक पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष मारोती भस्मे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जयंतीनिमित्त नृत्य, गाणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता अन्नदानाने करण्यात आली. या जयंती सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विजय मोहाळे, गजानन तुमाने, विजय तुमाने, डॉ. कुकडे, जनार्दन बावणे, करण तुमाने, ऋषी वारे, लखन श्रीनाथ, गोरख नेमाडे, विजू ढोले, बालाजी शिरफुले, दीपक सुरजूशे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. संत भीमा भोई जयंती सोहळ्या प्रतीसाद पुसद शहरातील गणेश वार्ड परिसरातील भोईपुरा येथे संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाने उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भोई समाज संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सखाराम नेमाडे यांनी संत भीमा भोई यांच्या समता, बंधुता व मानवतेच्या विचारांचे जतन करण्याचे आवाहन केले. या सोहळ्याला पुसदमधील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि भोई समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर