ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

शिवराज्याभिषेकदिनी तिवसा येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश:आ. राजेश वानखडे यांच्या हस्ते वृक्षारोपण; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सध्याच्या वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यामुळे पर्यावरण संतुलनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. कोरोनानंतरच्या काळात स्वच्छ, निरोगी, हरित पर्यावरणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत तिवसा येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. तिवसा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ. राजेश वानखडे यांच्याहस्ते श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या प्रस्तावित जागेवर (श्रीजीत मंगल कार्यालयाजवळ) वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन आ. वानखडे व उपस्थित मान्यवरांनी केले. “वाढते प्रदूषण, वृक्षतोड, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे. ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित आणि हिरवागार वारसा देण्यासाठी आजपासूनच कृती करण्याची गरज आहे,” असे आमदार म्हणाले. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेद्वारे जनतेमध्ये स्वाभिमान, संघटन, राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या याच विचारांमधून प्रेरणा घेत समाजहिताच्या कार्यात सक्रिय योगदान देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. या पर्यावरणपूरक आणि अभिवादन कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने प्रदीप गौरखेडे, विनोद पटेल, संजय देशमुख, विद्याधर दंडाळे, राजेंद्र पालीवाल, पप्पू देशमुख, श्रीधर देशमुख, प्रकाश अण्णा पडोळे, सुधिर गोडसे, राजाभाऊ देशमुख, अजय गुल्हाने, राजाभाऊ टेकाडे, अंकुश देशमुख, सुमित अनासने, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, राहुल धडांगे, सुधीर वानखडे, अनुप आढावू, दिनेश माळोदे, भोजराज गंधे, नंदकिशोर देशमुख, सुनील बहाद्दरपुरे, मयूर वानखडे, आनंद मानमोडे, सतीश नंदनवर, वैभव भोंबे यांच्यासह तिवसा परिसरातील अनेक नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर