ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पांडवदेवी मंदिराला मिळणार नवसंजीवनी:जीर्णोद्धारासह पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी नवी कार्यकारिणी सरसावली‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ऐतिहासिक वारसा, प्राचीन स्थापत्यकला आणि परिसरातील लाखो भाविकांचे धार्मिक श्रद्धेचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या मारेगाव येथील हेमाडपंथी पांडवदेवी मंदिराच्या विकासासाठी आता नव्या कार्यकारिणीने कंबर कसली आहे. अनेक वर्षांपासून निधीअभावी दुर्लक्षित राहिलेल्या या प्राचीन मंदिराला नवसंजीवनी देण्याचा दृढ निर्धार नवनिर्वाचित समितीने व्यक्त केला आहे. मंदिराच्या संपूर्ण जीर्णोद्धारासोबतच या परिसराला अधिकृत ”पर्यटनस्थळाचा” दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी धडपड केली जाईल, अशी ग्वाही कार्यकारिणीकडून देण्यात आली आहे. शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या पांडवदेवी मंदिराची ओळख परिसरात श्रद्धास्थान म्हणून आहे. मंदिराची हेमाडपंथी शैलीतील रचना, दगडी बांधकाम, कोरीव कलाकुसर आणि पुरातन वास्तुकला पाहण्यासाठी भाविकांसह इतिहासप्रेमीही येथे भेट देतात. मात्र गेल्या काही वर्षांत निधीअभावी योग्य देखभाल व मंदिराची अवस्था जीर्ण होत चालली होती. काही ठिकाणी दगडी बांधकाम खचण्याच्या स्थितीत असून परिसरातील अपुरी सुविधा आणि संरक्षण अभावी मंदिराचे वैभव झाकोळत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली असून मंदिर संवर्धनाला प्राधान्य देत विविध विकासकामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. मंदिर परिसर स्वच्छता, दगडी बांधकाम दुरुस्ती, सभामंडप सुशोभीकरण, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था, विद्युत रोषणाई, तसेच मंदिर परिसरात हरित वातावरण निर्माण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून मंदिराला राज्यस्तरीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात धार्मिक महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक यात्रा यांना प्रोत्साहन देऊन धार्मिक पर्यटन वाढवण्याचा मानस देखील या नवीन कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर