ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका! ✦ ⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार… ✦ ⚡ पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,… ✦ ⚡ Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं? ✦ ⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये
SP News Maregaon

संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर संशोधनासाठी फेलोशिप:अमरावती विद्यापीठाकडून संशोधकांना आर्थिक सहाय्य

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे श्री संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे. दानदाते श्री वासुदेवराव देशमुख यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधीतून ही योजना राबवली जात आहे. या फेलोशिप अंतर्गत, संत गुलाबराव महाराजांचे जीवन, साहित्य, विचार, तत्वज्ञान, शिक्षण आणि कवितेवर आचार्य पदवीसाठी (पीएच.डी.) संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला प्रति वर्ष ६ हजार रुपये याप्रमाणे दोन वर्षांसाठी एकूण १२ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ आणि २०२७-२८ साठी ही फेलोशिप दिली जाईल. यासाठी इच्छुक संशोधकांनी विद्यापीठात संशोधन करत असल्यास, विहित नमुन्यातील आवेदनपत्रे आगामी ३० जूनपर्यंत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. आवेदनपत्राचा नमुना आणि इतर तपशील विद्यापीठाच्या वित्त विभागात विनामूल्य उपलब्ध आहे. संशोधकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी थेट संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाने कळवले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर