ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

श्रीगोंदेत चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या, मृतदेह जाळला:पुरावा नष्ट करण्यासाठी बापानेही केली मदत, तिघांवर गुन्हा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्रीगोंदेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच 24 वर्षीय प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या बापाच्या मदतीने तिचा मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळला. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओहळ आणि त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणारे त्याचे वडील सुखदेव ओहळ या दोघांनाही अटक केली असून एकूण 3 संशयितांवर खुनाचा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिचे शुभमसोबत प्रेमसंबंध होते आणि दोघेही विवाह न करता एकत्र राहत होते. मात्र, शुभम तिच्यावर सतत संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते. घटनेच्या रात्री याच कारणावरून झालेल्या भांडणात रागाच्या भरात तरुणाने लोखंडी रॉड आणि फरशीच्या तुकड्याने तिच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यामुळे ती जागीच ठार झाली. आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवत केली अटक पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोतवाली पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदे पोलिसांनी रात्रीतूनच वेगाने सूत्रे फिरवली. संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवून मुख्य आरोपी आणि त्याच्या वडिलांना घरातूनच बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा काही तासांतच उघडकीस आला. दोन दिवस मुलीचा मृतदेह गादीत लपवला हत्येनंतर घाबरलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळला आणि घरातच लपवून ठेवला. त्यानंतर तो कुलूप लावून नगरला पळून गेला. दुसऱ्या दिवशी वडिलांना सोबत घेऊन परत आला. नंतर दोघांनी मध्यरात्रीपर्यंत योग्य संधीची वाट पाहिली आणि तिसऱ्या दिवशी मृतदेह जंगलात नेऊन पेटवला. तोपर्यंत मुलीचा मृतदेह गादीतच गुंडाळलेला होता. फोन कॉलने उघड केला गुन्हा हत्येनंतर घाबरलेल्या मुख्य आरोपीने अहिल्यानगरातील आपल्या एका मित्राला फोन करून ‘मी माझ्या बायकोला मारून टाकले’ असे सांगितले. आपण पोलिसांच्या कचाट्यात सापडू या भीतीने त्या मित्राने तातडीने कोतवाली पोलिसांना ही माहिती दिली. कोतवाली पोलिसांनी श्रीगोंदे पोलिसांना सतर्क करताच अवघ्या काही तासांत हा थरार उघडकीस आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर