ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

शिंदे महाविद्यालयाच्या चौघांची सैन्यात, तर कबड्डीपटूची पोलिस दलात निवड

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशसेवा, शिस्त, नेतृत्व आणि समर्पण यांचे प्रतीक असलेल्या राष्ट्रीय छात्र सेना विभागासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील चार कॅडेट्सनी केली. या चारही कॅडेट्सची भारतीय सैन्य दलात, महाविद्यालयाचा राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुषार भोसले याची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली. विशेष म्हणजे निवड झालेल्या पाचपैकी तिघे कबड्डी खेळाडू आहेत. सैन्य दलात निवड झालेले सिनिअर अंडर ऑफिसर करण राणेरजपूत, ज्युनियर अंडर ऑफिसर स्वप्निल जामदार, कॅडेट अर्जुन धोत्रे आणि कॅडेट साहिल ससाणे तसेच पोलीि दलात निवड झालेला तुषार भोसले यांचा गौरव प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब काळे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात व पर्यवेक्षक रत्नाकर झिटे यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे म्हणाले, भारतीय सैन्य दलात सेवा करण्याची संधी ही केवळ नोकरी नसून राष्ट्रसेवेचे सर्वोच्च कर्तव्य आहे. एनसीसी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, आत्मविश्वास आणि देशभक्तीची मूल्ये रुजवते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या यशस्वी कॅडेट्सचा आदर्श घ्यावा. आज या पाच विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे संपूर्ण महाविद्यालयासाठी प्रेरणादायी असून भविष्यात आणखी विद्यार्थी सैन्य, पोलिस व स्पर्धा परीक्षांत यश मिळवतील. सूत्रसंचालन कॅडेट अनुराधा शिंदे हिने, तर आभार डॉ. किरण ढवळे यांनी मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर