ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

उद्धव ठाकरे म्हणाले अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती:ठाकरेंच्या टीकेला तेजस्वी घोसाळकरांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या- त्यांचे नाव घेत उगाचच प्रचार करतायत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आज अभिषेक असता तर घोसाळकरांचे घर फोडण्याची भाजपची हिंमत झाली नसती, मला विनोद घोसाळकरांचा अभिमान वाटतोय. पण यावेळी भावनेत अडकू नका, मी तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात आलो नाही, तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावर आता भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांच्या प्रचार कार्यालयात उद्धव ठाकरेंनी भेट दिली होती. त्यावेळी भाजपने घोसाळकरांच्या घरात भांडण लावून फोडाफोडी केली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, मी आणि अभिषेकने दोघांनी मिळून प्रत्येक निर्णय घेतले होते. अभिषेक असता तर जे काही असेल ते दोघांनी मिळूनच केले असते. मला असे वाटते की, अजूनही अभिषेक माझ्याबरोबरच आहेत. उद्धव ठाकरे अभिषेकचे नाव घेऊन उगाचच प्रचार करत आहेत. निष्ठावंत वैगरे…ते चुकीचे आहे. उगाचच तुम्ही अभिषेकचे नाव कशाला घेत आहात. माझा नवरा आहे, मी काहीही करु शकते, अशी प्रतिक्रिया तेजस्वी घोसाळकर यांनी दिली आहे. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर