ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

धनंजय देशमुखांविरोधातील तक्रार निघाली खोटी!:आमदार मुंडेंनी गोळीबार केल्याचाही दावा खोटा; बीडमध्ये रंगले खोट्या तक्रारींचे नाट्य

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कधीही न घडलेल्या गुन्ह्यांचे दाखल झालेले गुन्हे अन् नंतर थेट आमदार धनंजय मुंडेंनी गोळीबार केल्याची तक्रार यामुळे रविवारचा दिवस चर्चेचा आणि बीड पोलिसांना तापदायक ठरला. दिवसभराच्या गोंधळानंतर हा सर्व प्रकार खोटा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले गेले. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या पोलिस अंगरक्षकाची पिस्तूल काढून ती आपल्या कानशिलावर लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलिसांत दिली होती. यावरून धनंजय देशमुखांवर गुन्हा नोंद झाला होता. तर याच प्रकरणात धनंजय देशमुख यांनीही समाधान खिंडकर यांनी आपल्याला शिविगाळ केली. त्यांच्याकडे पिस्तूल होते, त्यांनीही जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिली. त्यामुळे परस्पर विरोधी गुन्हे बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाले होते. या प्रकरणी पोलिस तपास सुरू करण्यात आला होता. मात्र, दिवसअखेर प्रकरणास वेगळे वळण मिळाले. पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर, मुंडेंविरोधातील तक्रार मागे धनंजय देशमुखांवर समाधान खिंडकर यांच्या तक्रारीवरून दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट केल्यानंतर धनंजय देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडेंविरेाधात दिलेली तक्रार मागे घेतली. यात कुठलाही गुन्हा नोंद केला नाही. कोण आहेत देशमुख आणि खिंडकर? देशमुख हे मस्साजोगचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत. तर समाधान खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर याचा भाऊ आहे. चार दिवसांपूर्वीच दादा खिंडकर याने समाधान खिंडकरविरोधात संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नको म्हणून धमकी दिल्याचा गुन्हा नोंद केला होता. पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई शक्य या प्रकरणात यंत्रणांचा गैरवापर करत खोट्या तक्रारी दिल्याने दोन्ही तक्रारदारांवर कारवाई होऊ शकते. सोबतच पुरेशी खात्री न करता गुन्हे नोंद केल्याने किंवा या प्रकरणात हलगर्जीपणा दाखवल्याने बीड ग्रामीण ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. सर्वच गुन्हे खोटे, यंत्रणेचा गैरवापर केला: पोलिसांचे स्पष्टकरण या प्रकारानंतर रविवारी दुपारी धनंजय देशमुख यांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून आमदार धनंजय मुंडे व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी आपल्याला पाली गावाजवळ घाटात अडवले. या वेळी धनंजय मुंडे यांनी दोन गोळ्या पिस्तुलातून फायर केल्या. तर परमेश्वर सातपुते यांनी पिस्तूल कानशिलावर लावल्याची तक्रार दिली. तसेच गुन्हा नोंद करण्यासाठी बीड पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांचा दिवसभर तपास, सर्वच बाबी खोट्या निघाल्या या प्रकरणानंतर आयपीएस अधिकारी व्यंकटराम यांनी बीड ग्रामीण ठाण्यात ठाण मांडले. शनिवारी रात्री धनंजय देशमुख व समाधान खिंडकर यांच्यावर दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणात सीसीटीव्ही जप्त केले, जबाब नोंदवले, साक्षीदार तपासले. २ तासांचे फुटेज पाहून असा प्रकार घडलाच नसल्याचे स्पष्ट केले. हे दोन्ही गुन्हे खोटे असून यात यंत्रणांचा गैरवापर केला गेला. त्याचा अहवाल न्यायालयाला देणार असल्याचे स्पष्ट केले. खोट्या गुन्ह्यामुळे देशमुखांकडून मुंडे टार्गेट आपल्यावर खोटा गुन्हा नोंद होत आहे. पोलिसांनी आधी सीसीटीव्ही व इतर बाबींची पडताळणी करावी. मग योग्य निर्णय घ्यावा, असे धनंजय देशमुख यांनी पोलिसांना रात्री सांगितले. पोलिसांनी त्यांना आम्ही खोटा गुन्हा घेणार नाही, असे आश्वासन देत परत पाठवले. मात्र ते गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. देशमुख यांनी थेट मुंडे यांच्याविरोधात तक्रार दिली. ज्या प्रमाणे माझ्याबाबत पडताळणी झाली नाही त्याचप्रमाणे आताही पडताळणी न करता गुन्हा नोंद करा अशी भूमिका घेत त्यांनी पोलिसांना कोंडीत पकडले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर