ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

नागपुरात आता झाडांचेही ‘डिजिटल हेल्थ कार्ड:एनएमसीकडून ‘लायडार’ तंत्रज्ञानाचा शुभारंभ, पावसाळ्यापूर्वी धोके ओळखणार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूर शहरात झाडांचे आरोग्य तपासण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने (NMC) ‘लायडार’ (LiDAR) तंत्रज्ञान आणले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाडांचे ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ तयार केले जाणार आहे. बुधवारी दीक्षाभूमी परिसरात महापौर नीता ठाकरे यांच्या उपस्थितीत या तंत्रज्ञानाचे लोकार्पण करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेने ‘स्माईल कौन्सिल’ उपक्रमांतर्गत ‘ट्रीकोटेक एलएलपी’ आणि ‘थ्रीहील पीटीई’ यांच्या तांत्रिक सहकार्याने ही मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या एका विशेष वाहनावर ‘लायडार’ स्कॅनर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रत्येक झाडाचे अचूक डिजिटल मॅपिंग करेल. या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक झाडाचे स्वतंत्र ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ तयार होईल. हे कार्ड झाडाची प्रजाती, अंदाजित वय, अंतर्गत पोकळी, खोडातील कुज आणि त्याच्या आरोग्याची सविस्तर माहिती देईल. यामुळे झाडांचे थ्री-डी मॉडेल तयार होऊन त्यांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होईल.

अनेकदा बांधकामे किंवा सिमेंटच्या जंगलामुळे झाडांची मुळे कमकुवत होतात, जे वरून दिसत नाही. हे ‘लायडार’ तंत्रज्ञान जमिनीतील आणि झाडाच्या संरचनेतील हे छुपे धोके पावसाळ्यापूर्वीच शोधून काढेल. यामुळे कोणत्या झाडाची छाटणी करायची, कोणावर उपचार करायचे किंवा कोणते झाड तातडीने सुरक्षित करायचे, याचे अचूक नियोजन पालिकेला करता येईल. यामुळे वादळ-वाऱ्यात झाडे उन्मळून पडल्याने होणारी जीवितहानी आणि वाहतुकीची कोंडी टाळता येईल. ‘लायडार’ हे एक अत्याधुनिक रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आहे, जे लेझर लाईटच्या मदतीने काम करते. वाहनावर बसवलेले लायडार यंत्र झाडांवर लेझर किरणांचा मारा करते. ही किरणे झाडाला किंवा जमिनीला धडकून परत यंत्राकडे आल्यावर, त्यांच्या प्रवासाच्या वेळेवरून झाडाचे अचूक अंतर, उंची आणि आकार मोजला जातो. एका सेकंदात लाखो लेझर किरणे सोडून हे तंत्रज्ञान झाडाचा हुबेहूब ‘थ्री-डी’ डिजिटल नकाशा तयार करते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर