ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

माळीपुरा येथे जैन मंदिरातील बाल संस्कार शिबिराचा समारोप‎:मंदिरामध्ये शिबिराचे आयाेजन; शिबिरात १८ विद्यार्थ्यांनी सहभाग, मान्यवरांकडून मार्गदर्शन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | यवतमाळ भावी पिढीला सुसंस्कारित व नैतिक मूल्यांनी परिपूर्ण घडवण्याच्या उद्देशाने श्री दिगंबर जैन मंदिर संस्थान, माळीपुरा येथे श्री कुंद कुंद दिगंबर जैन स्वाध्याय ट्रस्ट, नागपूर यांच्या वतीने २४ ते ३० मे या कालावधीत बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिबिरात अकोला येथील विद्वान पंडित रोहन घाटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या मधुर व रोचक शैलीतून णमोकार महामंत्र, इंद्रियज्ञान, सदाचार, आत्मा व परमात्मा आदी विषयांवर सोप्या आणि प्रभावी पद्धतीने विवेचन करून विद्यार्थ्यांना धर्मज्ञान दिले. शिबिरार्थींसाठी दररोज अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. ३० मे रोजी आयोजित समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री १००८ महावीर दिगंबर जैन मंदिर, वाघापूर येथील विनोद महाजन होते. यावेळी पंडित रोहन घाटे, दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष अशोक रोहणे, उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, नंदकुमार नेटके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विश्वस्तांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मंदिराचे अध्यक्ष अशोक रोहणे यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, सचिव दिलीप कहाते, सहसचिव दिलीप बाविस्कर, कोषाध्यक्ष विवेक नखाते, आशा महाजन, वृषाली गव्हाणे तसेच इतर पदाधिकारी, श्रावक व श्राविकांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी श्री दिगंबर जैन मंदिर संस्थान यांच्या वतीने सर्व श्रावक-श्राविका, शिबिरार्थी आणि पंडित रोहन घाटे यांचे आभार मानण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्यासह सर्व उत्तीर्ण शिबिरार्थींना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच पंडित रोहन घाटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर