ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

एमआयटीमध्ये एआय आधारित शिक्षण प्रणाली:शैक्षणिक संधी विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय) आधारित शिक्षण प्रणाली, अध्यापनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील शैक्षणिक संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एज्युकेशन समिट ऑन एआय शिक्षण : २०२६ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संचालिका प्रा. स्वाती कराड चाटे तसेच संस्थेच्या मार्गदर्शक व मेंटॉर प्रा. प्रभा कासलीवाल यांनी शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे महत्त्व सुरुवातीला अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी उपस्थितांना महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल, विविध पदवी व पदविका अभ्यासक्रम, संशोधन उपक्रम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्लेसमेंट सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधींची माहिती दिली. व एआय युगात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. साक्षी पारखे यांनी केले. पहिल्या सत्रात चैतल मगाडे यांनी एम एस ऑफिस मधील एआयचे अनुप्रयोग या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी वर्ड एक्सेल, आणि पावर पॉइंट मध्ये एआयच्या मदतीने काम अधिक जलद, अचूक आणि प्रभावी कसे करता येते याचे प्रात्यक्षिक सादर केले. व शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी एआय आधारित साधनांचा उपयोग कसा होऊ शकतो याची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात डॉ. प्रमोद रिडे यांनी औद्योगिक क्षेत्रातील एआयचे उपयोग आणि भविष्यातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले. उत्पादन, ऑटोमेशन, रोबोटिक्स, डेटा विश्लेषण, स्मार्ट उद्योग व्यवस्था आणि रोजगार क्षेत्रातील एआय मुळे होणारे बदल यांचे त्यांनी सविस्तर विश्लेषण केले. भविष्यातील स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी ए आय संबंधित कौशल्ये आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तिसऱ्या सत्रात प्रा. अजिंक्य लाडे यांनी दैनंदिन अध्यापनातील एआय टूल्स या विषयावर मार्गदर्शन केले. एआयच्या साहाय्याने अध्यापन अधिक आकर्षक, संवादात्मक आणि विद्यार्थी-केंद्रित कसे बनवता येईल याबाबत त्यांनी माहिती दिली. डिजिटल युगात शिक्षकांची भूमिका अधिक प्रभावी बनविण्यासाठी एआय हे सहाय्यक साधन ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय डॉ. माने यांनी केले. प्रा. व्यंकटेश मुडे यांनी आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर