ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

आधुनिक युगात स्पर्धेला तोंड देत विद्यार्थ्यांनी ध्येय गाठावे:आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन, बोरुडे मळ्यात मान्यवरांनी 400 गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे. पूर्वी क्लासेसची सुविधा नसतानाही देशाला अनेक संशोधक लाभले; त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी करिअरची वाटचाल करावी, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. बोरुडे मळा येथे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वतीने दहावी व बारावीतील सुमारे ४०० गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या सोहळ्याला माजी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, पुष्पाताई बोरुडे, डॉ. रणजीत सत्रे, मनीष अहुजा, अभिजित बोरुडे, स्वप्निल बोरुडे, प्रदीप बोरुडे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ४०० विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली. उपमहापौर ॲड. जाधव म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे आई-वडिलांचे मोठे योगदान असते. पालकांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारावी. माजी महापौर वाकळे म्हणाले, राजकारणात जनतेचे प्रश्न सोडवताना जसे सातत्य लागते, तसेच सातत्य विद्यार्थ्यांनी अभ्यासात आणि शिस्तीत ठेवले पाहिजे; तेच यशाचे गमक आहे. माजी महापौर फुलसौंदर म्हणाले, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश नक्कीच मिळते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून बोरुडे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. २० वर्षांची ज्ञान-चळवळ; मुलींची संख्या अभिमानास्पद : पुष्पा बोरुडे माजी सभापती पुष्पा बोरुडे म्हणाल्या, प्रभागाच्या विकासकामांसोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणारा हा उपक्रम गेली दोन दशके सातत्याने राबविला जात आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत मुलींची वाढती संख्या ही अत्यंत अभिमानाची बाब असून आज मुली सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर