ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मासिक सभेला सत्ताधाऱ्यांची पाठ:विरोधी गटाचे केवळ दोनच सदस्य सभेला उपस्थित, प्रश्नाकडे दुर्लक्ष‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीमध्ये पदसिद्ध प्रशासक म्हणून सरपंच तर प्रशासकिय समिती सदस्य म्हणून ग्राम पंचायत सदस्यांची शासनाने नियुक्ती केलेली असतांना शासनाने कुठलेही आर्थिक उलाढालीचे अधिकार ठेवले नसल्याने मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रशासक सरपंच व सदस्य यांनी मासिक सभेकडे पाठ फिरवली आहे. १३ सदस्य असलेल्या ब्राम्हणगांव ग्राम पंचायतच्या ३० मे रोजी झालेल्या तहकुब ग्रामसभेला विरोधी गटाचे केवळ दोन सदस्यांच्या हजेरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मासिक सभा पार घ्यावी लागली. यामुळे पावसाळ्यातील उद्‌भवणाऱ्या ज्वलंत समस्या कोण मार्गी लावणार असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ब्राम्हणगांव ग्रामपंचायत कार्यालयात दि. २८ मे ची तहकुब मासिक सभा दि. ३० मे शनिवार रोजी ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश राठोड यांनी घेतली या सभेला १३ सदस्यां पैकी विरोधी गटाचे शेख खदीर शे. हानिफ व ललीता कैलास वाठोरे हे दोन सदस्य हजर होते. ^दोन महिन्यांसाठी ग्राम पंचायतचे पदसिद्ध प्रशासक म्हणून माझी तर प्रशासकिय सदस्य म्हणून कार्यकारिणीतील सदस्य शासनाने नियुक्त केले आहेत. आमचा ५ वर्षाचा कार्यकाळ अगदी आनंदात गेला. शानदार निरोप समारंभही झाला. आता २ महिन्यांसाठी ही नियुक्ती असल्याने शासनाने आम्हाला आर्थिक अधिकार ठेवले नाहीत. पावसाळी समस्या भेडसावत आहेत. हातात हंटर नसल्याने पाणी पुरवठा कर्मचारी ऐकत नाहीत. – परमात्मा गरुडे, सरपंच तथा. शासनाने आम्हाला आर्थिक अधिकार ठेवले नाही

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर