ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पर्यावरण संवर्धनासाठी श्री दिगंबर जैन महासमितीकडून वृक्षारोपण:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑक्सिजन पार्कमध्ये लागवड; वृक्षसंवर्धनाचा संकल्प‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री दिगंबर जैन महासमिती, यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने गोधनी रोड येथील ऑक्सिजन पार्क (प्रयासवन) परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यावरणपूरक विविध वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपन व संवर्धनाचा सामूहिक संकल्प करण्यात आला. कार्यक्रमात महासमितीचे जिल्हाध्यक्ष अशोक रोहणे, सचिव डॉ. शेखर बंड, कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार महाजन, विधी सल्लागार ॲड. रवीशेखर बदनोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धन हे आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे आणि सामूहिक जबाबदारीचे कार्य आहे. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि तापमानवाढ यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. या उपक्रमात महासमितीचे कोषाध्यक्ष नेमिनाथ राऊळकर, सहसचिव राजेश इंदाने, जिल्हा कार्यकारिणी सदस्य उमेश पकाले, अजय गुलालकरी, अधीर काळे यांनी सहभाग नोंदवला. तसेच वन विभागाचे कर्मचारी योगेश वंजारी, अमोल वंजारी, लक्ष्मण मडावी यांनी वृक्षारोपणासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षलागवड व संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. र्यावरण निर्माण करण्यास हातभार लावावा वृक्षांमुळे शुद्ध प्राणवायू, स्वच्छ वातावरण, नैसर्गिक संतुलन टिकून राहण्यास मदत होते. आज लावलेले एक झाड भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्यास हातभार लावू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर