ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

गांजा, एमडीची क्रेझ; केमिकलचा अतिरेक….:यवतमाळात ‘ गांजा गँग” सक्रिय, व्यसनाचा पॅटर्न बदलला; चिंतेत पडली पोलिस यंत्रणा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमली पदार्थांच्या नशेत होता, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच स्थितीचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी त्याचा गेम केल्याची चर्चा आता परिसरात सुरू आहे. ५० रुपयांत मृत्यूचा विळखा यवतमाळ शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे इतके पसरले आहे की अवघ्या ५० रुपयांत गांजाची पुडी सहज उपलब्ध होत आहे. १५ ते २५ वयोगटातील तरुण या छुप्या बाजाराचे मुख्य बळी ठरत आहेत. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी या नशेबाजांचा उच्छाद सुरू असतो. माफियांचे कंबरडे मोडणार यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अमली पदार्थांची छुप्या मार्गाने विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी आता विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. ज्या ज्या भागात अमली पदार्थांची विक्री किंवा साठा केला जातो, त्या ठिकाणच्या विक्रेत्यांचा छडा लावला जाईल. त्यांना तात्काळ ताब्यात घेतले जाईल. त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिला आहे. पोलिस अधीक्षकांच्या यामुळे जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. नशा न मिळाल्यास हिंसक शहरातील काही विशिष्ट भागांमध्ये आता ”व्हाईटनर नशा” करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या चक्क टोळ्या तयार झाल्या आहेत. व्हाईटनरमध्ये ‘डायक्लोरो इथिलीन’ आणि ‘बेंझिन’सारखे घातक घटक असल्याने त्याची नशा ५ ते ८ तास राहते. वेळेवर नशा न मिळाल्यास ही मुले प्रचंड हिंसक बनतात. आत्महत्येचा प्रयत्न करतात. थेट गुन्हेगारीकडे वळतात. या नशेमुळे मुलांचे मानसिक संतुलन बिघडणे, बेशुद्ध पडणे, थेट हृदयविकाराचा झटका येणे, असा धोका डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. हल्ला प्रकरण, हल्लेखोर नशेत तेजस गायकवाड यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवणारे आरोपी नशेत पूर्णपणे धुंद होते. नशेत असतानाच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. घटनेच्या वेळी ते नशेत होते का, याची कायदेशीर पुष्टी करण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी केली . नशेत केलेल्या या कृत्यामागे जुना वाद होता की आणखी काही कारण, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर