ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

पडेगावमध्ये खोदकामात गंभीर निष्काळजीपणा:कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, मनपा गटनेते गणेश लोखंडे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महानगरपालिका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही लोखंडे यांनी दिला आहे. रस्ता पूर्ववत केला नाही पडेगावमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, खोदकामानंतर रस्ता पूर्ववत करण्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले असून विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना त्याचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे लोखंडे यांनी म्हटले आहे. समन्वयाअभावी काम रखडले विविध वृत्तपत्रांमधून वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित कंत्राटदार तसेच कामावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण यांच्या समन्वयाअभावी काम रखडले असून यामुळे आगामी पावसाळ्यात नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती गणेश लोखंडे यांनी दिली. फौजदारी कारवाईची मागणी संबंधित कंत्राटदार, कामावर देखरेख करणारे अधिकारी आणि खोदकामास परवानगी देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही लोखंडे यांनी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर