ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

तुका जातो वैकुंठाला नाट्य प्रयोगाने प्रेक्षक भारावले:अधिक महिन्यानिमित्त नरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त केले सादरीकरण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह निमित्त तुका केवडा केवडा तुका आकाशा एवढा अर्थात तुका जातो वैकुंठाला या नाट्यप्रयोगाचे यशस्वीरित्या सादरीकरण करण्यात आले. नरखेड ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी नाट्य मंडळ सोहाळे यांचा तुका जातो वैकुंठाला हा अत्यंत हृदयस्पर्शी असा नाट्यप्रयोग नरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक रंगमंचावर पार पडला. संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित अनेक प्रसंग या नाटकातून कलाकारांनी यशस्वीरित्या सादर केले सर्व प्रसंग पाहून प्रेक्षक भारावून गेले. श्री संत तुकाराम महाराज वैकुंठाला जात असताना सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या प्रसंगाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांची भेट पाहताना सर्व प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले. या ऐतिहासिक आणि भक्तीमय नाट्यप्रयोगाप्रसंगी सरपंच बाळासाहेब मोटे, माजी सरपंच विनोद पाटील, सुधाकर पाटील, समाधान मोटे, बाळासाहेब मोटे तसेच कार्यक्रमाचे संयोजक धर्मराज गोठणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निरंकार क्लासेसचे संचालक दिनेश नरळे नरखेड यांनी केले. या कलाकारांची भूमिका रंगमंचावर पार पडलेल्या या नाटकात छत्रपती शिवाजी नाट्य मंडळाच्या खालील कलाकारांनी मुख्य भूमिका चोख बजावल्या. संत तुकाराम महाराज: नाटकाचे लेखक प्राध्यापक बाळासाहेब चटे, मुंबाजीबुवा: सुरेश बचुटे, रामेश्वर शास्त्री: माऊली घुले, पांडुरंग: डॉ. मारुती जगताप, छत्रपती शिवाजी महाराज: गणेश चव्हाण.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर