ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

कुर्डुवाडीत अधिक मास, भागवत कथेला प्रतिसाद:नृसिंह अवताराच्या दर्शनाने भाविक मंत्रमुग्ध‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील हिंदू देवालय संस्थेच्या वतीने श्री राम मंदिर रेल्वे कॉलनी येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. पंढरपूर येथील ख्यातनाम कथाकार विनया संकेत कुलकर्णी (उत्पात) यांच्या ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण वाणीतून या कथेचे रसपान कुर्डुवाडीकरांना घडत आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक प्रसंगांचे सुंदर वर्णन करत प्रत्यक्ष नृसिंह अवतार स्टेजवर प्रकट करण्यात आल्याने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. ​कथेच्या दुसऱ्या पुष्पाचे निरूपण करताना विनयाताई कुलकर्णी यांनी सृष्टी वर्णन, कपिलदेव व्याख्यान, ध्रुव चरित्र आणि जडभरत व्याख्यान यावर प्रकाश टाकला. समाजात भक्तीचे महत्त्व सांगताना त्यांनी सात्विक, राजस आणि तामस या भक्तीच्या तीन प्रकारांचे पुराणातील विविध दाखले देऊन सोप्या भाषेत वर्गीकरण केले. ​तसेच सती अनुसया व अत्री ऋषींची कथा सांगून दत्त अवताराचे महात्म्य आणि पतिव्रता धर्माचे व्याख्यान त्यांनी मांडले. देवाधिदेव महादेव, शची आणि माता पार्वती यांच्या कथेचे निरूपणही त्यांनी अत्यंत रसाळ भाषेत केले. ​बाळ ध्रुवाच्या कथेचे वर्णन करताना कुलकर्णी यांनी ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या महामंत्राची शक्ती आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. त्यानंतर अजामेळ कथा सांगून भगवान नृसिंह अवताराची कथा सुरू झाली. या कथे दरम्यान प्रत्यक्ष स्टेजवर भगवान नृसिंहांचा अवतार प्रकट करण्यात आला. हा अलौकिक सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नृसिंह प्राकट्य झाल्यानंतर महाआरती करण्यात आली आणि उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करून दुसऱ्या दिवसाच्या कथेची सांगता झाली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर