ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

एपिस्टन फाईलमध्ये नाव आल्याने पंतप्रधानांच्या भूमिका बदलल्या:ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप; इंधन दरवाढीला मोदी जबाबदार

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूमिका सातत्याने बदल असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. भारताने इस्त्रायलला 4 कार्गो जहाजांमधून 800 टन मिलिट्री ग्रेड स्टील पाठवले होते. या स्टीलपासून 17 हजार तोफगोळे बनले असते. त्याचा वापर गाझा पट्टीत झाला असता. त्यामुळे इटलीने हे स्टील वाहून नेणारी जहाजे रोखली आहेत. पंतप्रधान मोदी याच जहाजांसाठी इटलीच्या खास दौऱ्यावर गेले होते, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी देशातील इंधन व गॅस टंचाई तसेच दरवाढीसाठी पंतप्रधान मोदीच एकमेव जबाबदार असल्याचाही दावा केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतात गॅस आणि इंधनाची टंचाई आहे. युद्ध संपल्यानंतर क्रूड ऑइल भारतात येणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. यामुळे इंधन आणि गॅसचे दर गगनाला भिडणार असून, त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. भारताची भूमिका पॅलेस्टाईनसोबत असावी, परंतु सरकार इस्रायलसोबत उभे आहे. यापूर्वी आपण पॅलेस्टाईनसोबत होतो, पण अचानक आपले धोरण बदलून इस्रायलसोबत का गेलो, याचा जाब जनतेने भाजपला विचारला पाहिजे, असे आंबेडकर यांनी नमूद केले. इस्रायलला भारत स्टील का पुरवत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान इटलीमध्ये गेले, कारण त्यांचा दुसरा हेतू होता. पॅलेस्टाईनमध्ये इस्रायलमुळे हल्ले सुरू आहेत. भारत इस्रायलला लक्ष्मी इंडस्ट्रीज, छत्रपती संभाजीनगर, जालना येथून पाठवण्यात आलेले 400 टन स्टील इटलीत पकडले गेले आहे. ही आंतरराष्ट्रीय दृष्टीने अत्यंत घातक बाब आहे. पकडण्यात आलेल्या वस्तू सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी इटलीला विनंती केली. भारताला क्रूड ऑइल पुरवठा करण्यास अनेक देश तयार आहेत, परंतु पंतप्रधानांची भूमिका इस्रायलसाठी झुकलेली आहे. देशाच्या हिताचे धोरण मोदी यांनी का बदलले, याचे उत्तर जनतेने पंतप्रधानांना विचारले पाहिजे, असे आंबेडकर यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाहनांचा अतिरिक्त वापर टाळा असे सांगतात आणि त्यांचे नेते अनेक उपाययोजना करताना दाखवतात, परंतु ते स्वतः आणखी गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. पंतप्रधान सोन्याची खरेदी करू नका असे जनतेला सांगत आहेत, म्हणजे महिलांना देखील ते अप्रत्यक्षपणे मंगळसूत्र वापरू नका असे सांगत आहेत, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर