ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अकोल्याला ताशी 32.50 लाख लिटर्स पाणीपुरवठा:मुख्य जलकुंभातून ग्रॅव्हिटी द्वारे संपूर्ण अकोला शहराला वितरण, माेठा दिलासा‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महान अकोला शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महान येथे उभारण्यात आलेल्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांतून दररोज शहराला लाखो लिटर्स पाणी पुरवले जात आहे. महान धरणातून ग्रॅव्हिटी द्वारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातील फाऊंटनमध्ये आणले जाते. सर्वप्रथम पाण्यात तुरटी टाकली जाते. त्यानंतर हे पाणी क्लॅरिफायरमध्ये सोडून गाळ मुक्त केले जाते. फिल्टर प्लांटमध्ये पाणी शुद्ध झाल्यावर त्यात ब्लिचिंग पावडर व आवश्यक प्रमाणात क्लोरिन गॅसचा डोस दिला जातो. हे शुद्ध पाणी पंपांद्वारे अकोला-महान रस्त्यावरील टिटवा फाट्यासमोरील मुख्य जलकुंभात सोडले जाते व तेथून ग्रॅव्हिटी द्वारे संपूर्ण अकोला शहराला वितरित होते. शहरातील विविध जलकुंभांना पुरवठा ६५ एमएलडी फिल्टर प्लांटवरून अकोल्यातील श्रद्धा नगर, केशनगर, आदर्श कॉलनी, तोष्णीवाल लेआउट, महाजनी, रेल्वे स्टेशन, मराठी शाळा, अकोट फैल, खडकी, मलकापूर, गंगानगर, जोगळेकर, लोकमान्य नगर, हरिहर पेठ, नेहरू पार्क, मोठी उमरी आणि लहान उमरी या सर्व जलकुंभांना पाणी पुरवले जाते. तसेच, २५ एमएलडी फिल्टर प्लांटवरून शिवणी, शिवर, आश्रय नगर, शिव नगर व बसस्थानक या जलकुंभांना पाणीपुरवठा केला जातो. पातळी घटल्याने गाळ अधिक उन्हाळ्याचे दिवस पाहता महान धरणाची जलपातळी २३ टक्क्यांखाली आल्याने धरणातून येणाऱ्या पाण्यात गाळ अधिक प्रमाणात आहे. जलशुद्धीकरण केंद्रात त्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून पाणी शुद्ध केल्या जाते. शुद्ध झालेले पाणी पंपांद्वारे अकोला शहराला पुरवठा केले जाते, अशी प्रतिक्रीया जलशुद्धीकरण केंद्राचे शाखा अभियंता आशिष भालेराव यांनी दिली. केंद्राची क्षमता व पाणीपुरवठा सध्या केंद्रात ६५ एमएलडी क्षमतेचे सहा पंप असून, त्यापैकी तीन पंपांतून ताशी २५ लाख लिटर्स आणि २५ एमएलडीच्या एका पंपातून ताशी साडेसात लाख लिटर्स पाणी उपसले जात आहे. म्हणजेच दोन्ही फिल्टर प्लांटमधून अकोला शहराला ताशी एकूण ३२.५० लाख लिटर्स पाणीपुरवठा केला जात आहे. सरासरी २४ तासांत ६५ एमएलडी प्लांटमधून ६० एमएलडी,पाणी पुरवले जाते. एकूण नऊ पंपांपैकी सध्या चार पंप कार्यरत असून, तीन पंप स्टँडबाय व दोन पंप नादुरुस्त आहेत. नऊपैकी २ पंप नादुरुस्त; सध्या चारने पुरवठा १. ६५ एमएलडी प्लांट (नवीन इमारत): एकूण सहा पंपांपैकी तीन पंप सुरू आहेत. दोन पंप स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले आहेत, तर एक पंप नादुरुस्त आहे. २. २५ एमएलडी प्लांट (जुनी इमारत): एकूण तीन पंपांपैकी एक पंप सुरू आहे. एक पंप स्टँडबाय असून एक पंप नादुरुस्त आहे. म्हणजेच सध्या चार पंपांद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू असून थीन पंप आपत्कालीन स्थितीसाठी स्टँडबाय आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर