ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

रोहित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी दिले 5 कोटींचे पॅकेज:खोटे आरोप करण्यासाठी खास नेमणुकाही केल्या, सूरज चव्हाण यांचा आरोप

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी तथा पक्षाच्या नेत्यांची बदनामी करण्यासाठी एका एजन्सीला तब्बल 5 कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी केला आहे. आमच्या पक्षातील प्रश्न सोडवण्यासाठी, कुणी चुकला तर त्याला शिक्षा देण्यासाठी आमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार सक्षम आहेत. त्यामुळे कुणीही आमच्या पक्षात लुडबूड करू नये. यापुढे आमच्या पक्षावर टीका केली, तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणालेत. आमदार रोहित पवार गत काही दिवसांपासून सातत्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर विशेषतः सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. त्यांनी त्यांच्यावर पक्षाच्या संघटनेतील काही प्रमुख फ्रंटल सेलही वगळल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावर पक्षाची बदनामी करण्यासाठी सुनियोजित मोहिम चालवण्याचा पलटवार केला आहे. ते म्हणाले, रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी, पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी एका एजन्सीला 5 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोटे आरोप करण्यासाठी त्यांनी नेमणुका केल्या आहेत. फ्रंटल संघटना वगळल्याचा आरोपही फेटाळला ते पुढे म्हणाले, रोहित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे काम करत आहेत. राष्ट्रवादीत कशी फूट पडेल, राष्ट्रवादीत कशी भांडणे लागतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. त्यांच्याच एका प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन अशी बातमी सोडली की, राष्ट्रवादीच्या पक्षातून काही फ्रंटल वगळण्यात आले. त्यात ओबीसी, सामाजिक न्याय व इतर सेलचा समावेश आहे. त्यांनी अर्धवट माहिती माध्यमांना दिली. ही माहिती धादांत खोटी आहे. आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे 5 विभाग आहेत. यात फादर बॉडी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, युवक बॉडी, विद्यार्थी व सेवा दलाचा समावेश आहे. विरोधक एक कागद दाखवत महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यांनी असे सांगितले की, सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय व अल्पसंख्याक हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आले. पण हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते. ते सेल म्हणून राष्ट्रवादीत कार्यरत होते. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातील आर्टिकल 27.1 मधील ही माहिती आहे. पण पत्रकारांना थेट आर्टिकल 30 ची देण्यात आली. त्यातील 28 चा पेपर वगळण्यात आला. या आर्टिकल 28.1 मध्ये एससी, एसटी, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडींचा समावेश आहे. त्याची माहिती निवडणूक आयोगालाही देण्यात आली आहे. या संघटनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आल्यापासून सेलचा दर्जा देण्यात आला आहे, असे सूरज चव्हाण म्हणाले. जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत कसा येईल, त्याची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादीची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी रोहित पवार व त्यांच्या टीमकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. माझे त्यांना सांगणे आहे की, जेवढे लक्ष तुम्ही आमच्या पक्षावर देत आहात, तेवढेच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारांवर द्या. तुम्ही तेवढेच लक्ष तुमच्या खासदारांवर, तेवढेच लक्ष तुम्ही तुमच्या संघटनेतील कार्यकर्त्यांवर द्या. कारण, ते तुमच्या पक्षात नाही, तर दुसऱ्या पक्षात आहेत. आज तुमचे मोहोळचे आमदार कोणत्या पक्षाचे बॅनर लावून कार्यक्रम घेत आहेत हे पाहा. सोलापूर जिल्ह्यातील तुमचे आमदार, खासदार कोणत्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनरखाली काम करतात ते ही पाहा. त्यानंतर आमच्या नेत्यांवर बोला. आमच्या पक्षातील प्रश्न सोडवण्यासाठी, पक्षात कुणी चुकला तर त्याला शिक्षा देण्यासाठी सुनेत्रा पवार सक्षम आहेत. कुणीही आमच्या पक्षात लुडबूड करू नये. यापुढे आमच्या पक्षावर टीका केली, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही सूरज चव्हाण यांनी यावेळी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर