ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करा:दिंडोरीत तालुका काँग्रेसने दिले तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून, इंधन दरवाढ तातडीने कमी करावी, या मागणीसाठी दिंडोरी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असून शेती व्यवसायही अडचणीत सापडत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने इंधनावरील करांचा फेरविचार करून दर कमी करावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पिंगळ यांनी इंधन दरवाढीसाठी सरकारची धोरणे कारणीभूत असल्याचा आरोप करत, दरवाढ रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच तालुका कार्याध्यक्ष प्रा. नारायण पाटील यांनी निवेदनाची दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन केले. यावेळी पंडितराव गायकवाड, सुनील आव्हाड, वाळू जगताप, दिलीप शिंदे, नामदेव राऊत, धर्मराज जोपळे यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर