ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं…
SP News Maregaon

बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष पुढाकार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठी
नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. कराराच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. या सामंजस्य कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बालकांचे आरोग्य हे राज्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही केवळ आरोग्य क्षेत्राची जबाबदारी नसून समाजाची एकत्रित बांधिलकी आहे. या कराराच्या माध्यमातून आपण मुलांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकत आहोत. हा करार नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत करण्यात आला असून, या अंतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहुड एनसीडी क्लिनिक्स स्थापन व कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून टाईप-1 मधुमेह, जन्मजात हृदयरोग, दमा, स्थूलता, सिकलसेल, मानसिक आरोग्य आणि विकासात्मक विकार यांसारख्या आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मानकीकृत उपचार पद्धती, डेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे. करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आलेले हा सामंजस्य करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित असणार आहे. या करारांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत गुणवत्ता, उपलब्धता आणि सर्वसमावेशकता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव विलास बेंद्रे तसेच डॉ प्रशांत जोशी, एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक, डॉ मीनाक्षी गिरीश, बालरोग तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. एम्स, नागपूर संस्थेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर