ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सरकारने कर्जमाफी करताना जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली:खुडसरगावचे शेतकरी आक्रमक, फसव्या कर्जमाफीचा निषेध

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ता मिळवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर शासनाने कर्जमाफी करताना अनेक जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारचे हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार असून, सरकारने दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. आज खुडसरगाव येथे संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने महायुती सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या फसव्या जीआरचा (शासन निर्णय) निषेध करण्यात आला. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल या आशेने महायुती सरकारला भरघोस मतांनी विजयी करून सत्तेची चावी सोपवली. मात्र, सरकारने कर्जमाफी लागू करताना त्यात अनेक जाचक अटी आणि निकष घातले आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असून, ही शुद्ध फसवणूक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.यावेळी ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडताना खालील प्रमुख मागण्या केल्या. फडणवीस सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या नावाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी बदलाव्यात,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आयोजित या आंदोलनात सतीश पवार, सचिन पवार, गणेश पवार, दादा गुरसळ, कुणाल पवार, माऊली निशाणे, किरण माकोणे, सुनील पवार, लक्ष्मण पवार, कैलास रेवाळे, विनायक पवार, बापु क्षिरसागर, भगिरथ पवार, दत्तात्रय भालके यांच्यासह खुडसरगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने या मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर