ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मंगेश काळोखे हत्या प्रकरण:एकनाथ शिंदेंनी घेतली कुटुंबीयांची भेट, सुनील तटकरे रायगडचा आका म्हणत महेंद्र थोरवेंचे गंभीर आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता टोकाचा आणि हिंसक वळणावर पोहोचला आहे खोपोली येथील शिवसेनेच्या महिला नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरचौकात निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. आमदार महेंद्र थोरवे यांनी काळोखे हत्याकांडप्रकरणी सुनील तटकरेंवर खळबळजनक आणि गंभीर आरोप केलेत. आरोपी रवींद्र देवकर याने हत्येच्या चार-पाच दिवसांपूर्वी सुतारवाडी येथे जाऊन सुनील तटकरे यांची भेट घेतली होती, असा दावा महेंद्र थोरवे यांनी केला आहे. “रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी रक्तरंजित राजकारण सुरू केले असून विरोधकांच्या हत्या त्यांच्या सांगण्यावरून केल्या जात आहेत. तटकरे हेच रायगडचा ‘आका’ बनले आहेत,” असा खळबळजनक आरोप महेंद्र थोरवे यांनी केला. पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाचा इशारा या हत्येत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचाही सहभाग असून, सुधाकर घारे आणि रवींद्र देवकर यांनी ‘प्री-प्लॅन’ करूनच मंगेश काळोखे यांना संपवल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे. जोपर्यंत सुधाकर घारेसह 10 आरोपींना अटक होत नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाही. याप्रकरणी पोलिस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही थोरवे दिला आहे. शिंदेंनी घेतली काळोखे कुटुंबीयांची भेट दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काळोखे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्र्यांना पाहताच कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले. “आरोपींवर मकोका लावा आणि त्यांना फाशीची शिक्षा होईल असे पहा,” अशी आर्त साद काळोखे कुटुंबाने घातली. यावर शिंदे यांनी अत्यंत कठोर भूमिका मांडली. “काळोखे कुटुंब हे शिवसेनेचे कुटुंब आहे. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या हत्याकांडातील एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाला दिला. नगरपालिका निवडणुकीची किनार? रायगडमध्ये नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडल्या असून, निकाल लागल्यानंतर काहीच दिवसांत हे हत्याकांड घडल्याने याला राजकीय किनार असल्याचे स्पष्ट होत आहे. मंगेश काळोखे यांची हत्या भरचौकात करण्यात आली, ज्यामुळे खोपोली शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शिवसेनेने या हत्येसाठी थेट राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना जबाबदार धरल्यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन मित्रपक्षांमधील दरी आता आणखी रुंदावली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर