ब्रेकिंग न्यूज
गुरुपौर्णिमेनिमित्त साई मित्र परिवाराचा १७ वा रक्तदान महायज्ञ,श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संगम; रक्तदान शिबिर, महाप्रसाद व भव्य शोभायात्रेचे आयोजन Pune Rain: पुणेकरांनो सावधान! पुढील 2 दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; ‘या’ ठिकाणी जाणं टाळाच, हवामान विभागाचा इशारा Mirabai Chanu : गळ्यात चमकणारं ‘गोल्ड मेडल’ अन् राष्ट्रगीत कानावर पडताच डोळ्यातून घळाघळा पाणी, गोल्डन स्टार… ‘ईव्ही’ गाड्यांची डीलरशिप घ्यायला गेला, बांधकाम व्यावसायिक एका चुकीत फसला, शेवटी…, नाशिकमध्ये काय घडलं? Pune Rain: पुणेकरांनो, पुढील 48 तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून ‘धोक्याचा इशारा’, घराबाहेर पडण्याआधी हे व… Chandrapur : पोलवर चढले कर्मचारी अन् वाघाची एंन्ट्री, कशी झाली सुटका? थरारक VIDEO Chandrapur : पोलवर चढले कर्मचारी अन् वाघाची एंन्ट्री, कशी झाली सुटका? शेतकऱ्यांनो सोलर पंप वापरताय? ही चूक ठरू शकते जीवघेणी, अशी घ्या काळजी Kolhapur: पती-पत्नीत भांडण, आजीसासू भाकरी करत होती, नातजावयाचं भयंकर कृत्य, कोल्हापुरात खळबळ लग्नानंतर 12 वर्षांनी जन्मलेला समर्थ, कुत्र्याने पाय चाटला अन् अनर्थ घडला, सोलापूरच्या घटनेनं हळहळ
SP News Maregaon

Mirabai Chanu : गळ्यात चमकणारं ‘गोल्ड मेडल’ अन् राष्ट्रगीत कानावर पडताच डोळ्यातून घळाघळा पाणी, गोल्डन स्टार…

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Mirabai Chanu Emotional after Gold medal : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ग्लासगो 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण 190 किलो वजन उचलून भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे. 48 किलो वजनी गटात सलग तिसरं राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकल्यानंतर जेव्हा भारताचं राष्ट्रागीत वाजू लागलं तेव्हा मीराबाई चानूच्या डोळ्यातू आपोआप अश्रू बाहेर आले. तिच्या मनातील वेदना, घटस्फोटानंतर लोकांची ट्रोलिंग, हतबलता आणि मेहनत डोळ्यातून अश्रूरुपी प्रकट झाली. समोर तिरंगा फडकताना पाहून मिराबाईला भावना अनावर झाल्या होत्या.
मला काहीच कल्पना नव्हती… – मीराबाई चानू
मी अत्यंत आनंदी आहे आणि खूप भावूकही झाले आहे. या स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पदक जिंकण्यासाठी मी अनेक त्याग केलाय. तसेच तणाव आणि दुखापतींवर मात केली. मी राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित करेन याची मला कल्पना नव्हती. माझं संपूर्ण लक्ष केवळ माझ्या प्रशिक्षकांनी दिलेल्या ‘लिफ्ट’ यशस्वीपणे पूर्ण करण्यावरच केंद्रित होतं, असंही मीराबाई चानू यांनी सांगितलं.

INDIAN NATIONAL ANTHEM IN GLASGOW
– Mirabai Chanu got emotional after winning the Gold Medal for India in Weightlifting!   pic.twitter.com/UfNeFHXg1a
— The Khel India (@TheKhelIndia) July 26, 2026

मी राष्ट्रध्वज पाहते तेव्हा… – मीराबाई चानू
जेव्हा जेव्हा मी भारतीय राष्ट्रध्वज पाहते आणि आपले राष्ट्रगीत ऐकते, तेव्हा मी भावूक होते. भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकल्याचा मला खूप आनंद आहे आणि देशभरातील सर्वांचे त्यांच्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छिते, असंही मीराबाई म्हणाली. असं बोलताना देखील मीराबाईच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. मीराबाईच्या आईने देखील आनंद व्यक्त केला अन् तिच्या दुखापतीविषयी सांगितलं.

#WATCH | Glasgow, Scotland: Mirabai Chanu gets emotional as she talks about the support from her family and coach.
Mirabai Chanu won the Gold Medal in the Women’s 48kg Weightlifting event at Commonwealth Games. pic.twitter.com/rubZZ1iSHb

— ANI (@ANI) July 26, 2026

कशी जिंकली मीराबाई चानू?
क्लीन अँड जर्कमध्ये, चानू 82 किलो वजनाच्या पहिल्या प्रयत्नात अडखळली, पण तिने लगेचच सावरत दुसऱ्या प्रयत्नात ते वजन यशस्वीपणे पार केले आणि त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 85 किलो वजन यशस्वीरित्या उचलून नवीन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर मीराबाईने 105 किलो वजन यशस्वीरित्या उचलून आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली.
मीराबाईची आई काय म्हणाली?
मला खात्री होती की ती जिंकेल आणि ती जिंकलीही… मला अत्यंत आनंद झाल्याची ही तिसरी वेळ आहे. आज, स्पर्धा सुरू करण्यापूर्वी तिने यशासाठी आशीर्वाद मागण्याकरिता मला फोन केला होता. सायंकाळी 5 वाजता तिने पुन्हा आशीर्वाद घेण्यासाठी मला फोन केला आणि आपण तिसरी स्पर्धा जिंकल्याचे मला सांगितलं. तिला दुखापत झाल्यामुळे ती जिंकेल की नाही, याबद्दल मला थोडी शंका होती; तरीही, ती यावेळी जिंकल्यामुळे मी खूप उत्साहित होते. याआधीही ती जिंकली होती आणि ही तिची तिसरी वेळ होती. मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे, असं मीराबाईच्या आईने म्हटलं आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर