ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

करवसुलीत नवी मुंबई महापालिकेचा विक्रम:876 कोटींचा टप्पा पार; डिजिटल पद्धतीचा फायदा,अभय योजनेचा मोठा परिणाम

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवी मुंबई महानगरपालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 876 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून, महापालिकेच्या स्थापनेनंतर एका वर्षात झालेली ही सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. विशेष म्हणजे, एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महापालिकांच्या तुलनेतही नवी मुंबई महापालिका करवसुलीत आघाडीवर राहिली आहे. नियोजनबद्ध मोहिमा आणि अभय योजनेचा प्रभाव यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कर वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा या यशाचा महत्त्वाचा घटक ठरला. नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून कर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे एकूण वसुलीपैकी सुमारे 60 टक्के रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा झाली आहे. याशिवाय एसएमएस, व्हॉट्सअॅप संदेश, नोटीस आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला. यामुळे करदात्यांचा प्रतिसाद वाढला आणि वसुली प्रक्रियेला गती मिळाली. सुट्ट्यांच्या दिवशीही कर संकलन केंद्र सुरू ठेवून महापालिकेने विशेष प्रयत्न केले. थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी 10 मार्च ते 31 मार्च 2026 दरम्यान अभय योजना राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास विलंब शुल्कात 50 टक्क्यांची सवलत देण्यात आली. या सवलतीमुळे अनेक मालमत्ताधारकांनी थकबाकी भरून प्रतिसाद दिला, ज्याचा थेट फायदा महसूल वाढीस झाला. सोयीस्कर सेवा देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने केलेल्या नियोजनबद्ध कार्यपद्धती, डिजिटल सुविधा आणि नागरिकांशी सातत्याने संवाद या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे यंदाची करवसुली विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. भविष्यातही अशाच पद्धतीने अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर