ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

हिंगोलीत विद्युत पंप चोरणाऱ्या तिघांना अटक:2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्‍वास

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आखाडा बाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून उच्छाद मांडलेल्या विद्युतपंप चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून बुधवारी ता. १० सकाळी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरटे जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. आखाडा बाळापूर परिसरात कालव्यावर तसेच कयाधू नदीवर विद्युतपंप बसवून शेती सिंचन केले जाते. मात्र रात्रीच्या वेळी चोरट्यांनी विद्युत पंपासोबतच केबल व पाईप चोरण्याचा सपाटा लावला होता. रात्रीच्या वेळी विज पुरवठा नसल्याने शेतकरी घरी गेल्याची संधीसाधत चोरट्यांनी हातसाफ करण्यास सुरवात केली होती. या प्रकारामुळे शेतरकी रात्रीच्या वेळी विद्युतपंपाजवळ पहारा देण्यासाठी थांबत असल्याचे चित्र होते. मात्र या प्रकरणात शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला होता. त्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले होते. यामध्ये उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार भुजंग कोकरे, शिवाजी जालमिरे, विशाल खंडागळे, आझम प्यारेवाले, मुनीर प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, ज्ञानेश्‍वर गोरे, शंकर हराळ यांच्या पथकाने माहिती घेण्यास सुरवात केली होती. यावेळी पोलिसांनी शेख वजीद शेख आयुब, शेख जिलानी शेख रब्बानी, संजय उर्फ न्यायपाल हिरामण नरवाडे (सर्व रा. शेवाळा) यांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक केली. त्यांच्याकडून चार विद्युतपंप, ८०० फुट केबल, एक तीनचाकी ॲटो असा २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक शरद मरे, जमादार बालाजी जोगदंड, प्रशांत शिंदे पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर