ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अवैध गोवंश तस्करांवर मोठी कारवाई:15 गोवंशांना जीवदान; मुद्देमाल जप्त

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ऑपरेशन प्रहार अंतर्गत डबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात एक मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध कत्तलीसाठी निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या १५ गोवंशांची सुटका करण्यात आली असून, चार लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेकूरकर यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली, खैर मोहम्मद प्लॉट परिसरात एका इसमाने गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवली आहेत. त्यानुसार त्यांच्या पथकाने खैर मोहम्मद प्लॉट येथील एका गोठ्यावर छापा टाकला. या छाप्यात गोठ्याचा मालक मोहम्मद अदनान शेख इरफान (२०),रा. खैर मोहम्मद प्लॉट, अकोला याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १५ गोवंश जातीची जनावरे जप्त करण्यात आली. सर्व जनावरे जखमी असल्याने उपचार व सुरक्षित संगोपनासाठी त्यांना आदर्श गोसेवा संस्थान, म्हैसपूर येथे पाठवले आहे. ही कारवाई पो. नि. नितीन लेव्हरकर, सपोनि गोपाल जाधव, उप निरीक्षक माजिद पठाण, अंमलदार शेख हसन, अब्दुल माजीद, भास्कर धोत्रे, रवी खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन, श्रीकांत पातोंड आणि दिपके यांनी केले. कारवाई करुन गोवंश मुक्त करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर