ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

पुसदमध्ये मोकळ्या जागेवरून अवैध प्रवासी सुरूच‎:बसस्थानक परिसरातून होणाऱ्या वाहतुकीला कधी बसणार चाप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील बसस्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवाशांना होणारा त्रास आणि अवैध प्रवासी वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी सध्या जोर धरत आहे. पुसद बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील नो-पार्किंग झोनमध्ये अवैध वाहने उभे करून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. एका गॅस एजन्सीच्या बाजूला बेलोरा पॉईंट येथे धोकादायकरित्या व अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. पोलिसांच्या मदतीने त्या वाहनावर कारवाई करून कायमस्वरूपी त्या ठिकाणचा बेलोरा पॉईंट बंद करावा अशी मागणी नागरिकाकडून सध्या जोर धरत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवाशांची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहे. यामुळे बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्यासह एसटी बसच्या आवागमनालाही अडथळे येत होते. या पार्शवभूमीवर स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई सुरू करण्याची मागणी होत आहे. बस स्थानक समोरील जयस्वाल गॅस एजन्सी लगत खाजगी असलेल्या मोकळ्या जागेत सध्या अवैध वाहतूक बोळावली आहे. त्या ठिकाणावरून खंडाळा, लोणदरी फाटा, जनुना फाटा, मारवाडी फाटा, बेलोराकडे प्रवासी घेऊन जातात. त्याच मोकळ्या जागेमध्ये गॅस एजन्सी तर्फे सिलेंडरचे वितरण केले जाते. सिलेंडर वितरणावेळी शेकडो गॅसधारक सिलेंडर घेण्यासाठी जमा होतात. त्यामुळे काही अपरिहार्य घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न जागृत नागरिकांच्या मनामध्ये घर करून बसला आहे. सोबतच नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी वाढली आहे. या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतुकीत शिस्त निर्माण होण्यास मदत होईल. त्यासाठी अवैध वाहतूकीवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर