ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

नेत्रदानाची जबाबदारी समाजातील प्रत्येकाने स्वीकारावी- सुरेश साबू:जागतिक नेत्रदान दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांची नियोजन सभा‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नेत्रदान हे अत्यंत मोठे आणि महान सामाजिक कार्य असून गेल्या १६ वर्षांपासून हरिना फाऊंडेशन या कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता या जनजागृती अभियानाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष सुरेश साबू यांनी केले. आगामी १० जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त हरिना फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रमांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून नेत्रदानाचा प्रचार-प्रसार करून सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली जाते. यावर्षी “माझ्या जीवनातील अंतिम भेट-राष्ट्राच्या नावाने’ या अभिनव संकल्पनेद्वारे नेत्रदानाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत तसेच जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमात शहरातील सामाजिक, व्यापारी, शैक्षणिक व विविध संस्थांचा सहभाग निश्चित करण्यासाठी हॉटेल राय जिरा येथे हरिना फाऊंडेशनतर्फे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये जागतिक नेत्रदान दिनाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सूचना व मते मांडली. सभास्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांनी नेत्रदानाचा संकल्प नोंदवून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरात मागील अनेक वर्षांपासून हरिना नेत्रदान समितीद्वारे नेत्रदान जनजागृतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहे. यामुळे अनेकांनी आपले नेत्र मरणोपरांत दान केले असून त्यामुळे अनेक दृष्टीहिनांना नवी दृष्टी मिळाली आहे. त्यांनाही हे जग तसेच त्यातील विविध रंग बघता आले आहे. ज्यांच्या जीवनात आजवर केवळ अंधार आहे, अशांनाही सुंदर जग बघण्याचा अधिकार असून मृत्यूनंतर आपले नेत्र इतरांच्या कामी आले तर त्यासारखे पुण्य नाही, ही भावना समाजातील प्रत्येक नागरिकाने ठेऊन नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात आज नेत्रदान दिनानिमित्त रॅली शहरात १० जून रोजी सकाळी ८ वाजता नेहरू मैदानातून जागतिक नेत्रदान दिनानिमित्त रॅली काढली जाणार असून या रॅलीत शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन, हरिना नेत्रदान समितीद्वारे करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे शहरवासीयांना नेत्रदान करण्याचा संदेश दिला जाणार असून मरणोपरांत नेत्रदान केल्यामुळे अनेकांना दृष्टी मिळून त्यांना ही सृष्टी बघता येईल.नेत्रदान करणे हे राष्ट्रीय दायीत्व समजून त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच समाजातील इतर नागरिकांना नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळेल, असे आयोजकांनी मत व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर