ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

‘ऑपरेशन टायगर’च्या बातमीने ठाकरे गटात अस्वस्थता:बातमी देणाऱ्या वृत्तपत्रावर करणार कायदेशीर कारवाई; ठाकरे – अरविंद सावंतांत चर्चा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 8 खासदारांची गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे व संबंधित खासदारांनी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा करत हे वृत्त फेटाळून लावली आहे. पण यामुळे ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाने हे वृत्त देणाऱ्या वृत्तपत्रावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी ठाकरे गट लवकरच ठोस पाऊल उचलणार आहे. खासदार संजय राऊत यांनी एका पोस्टद्वारे स्वतः याचे संकेत दिलेत. मुंबई स्थित एका वृत्तपत्राने नुकतेच एकनाथ शिंदे व ठाकरे गटाच्या 8 खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त दिले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बुधवारी रात्री अचानक ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात शिंदेंनी ठाकरे गटाच्या 8 खासदारांची भेट घेतली. त्यांच्यातील बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती. या बैठकीला एकनाथ शिंदेंसोबत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेही हजर होते, असा दावा या वृत्तात करण्यात आला होता. या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर अरविंद सावंत व ओमराजे निंबाळकर यांनी हे वृत्त जोरकसपणे फेटाळून लावले होते. संबंधित वृत्तपत्रावर होणार कायदेशीर कारवाई या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी तातडीने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट गेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यात कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना चुकीचे वृत्त छापून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित वृत्तपत्राला नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी एका ट्विटद्वारे या संभाव्य कारवाईची माहिती दिली. ते आपल्या पोस्टमध्ये संबंधित वृत्तपत्राची बातमी पोस्ट करत म्हणाले, या वृत्तपत्राने आणि बातमीदाराने कायदेशीर कारवाई ची तयारी ठेवावी. होय. यापुढे अशा गुन्ह्यांना माफी नाही. enough is enough!
सावंतांनी ठाकरेंशी प्रतारणा करणार नाही असे लिहून दिले बैठकीनंतर अरविंद सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला त्या बैठकीविषयी एकही शब्द विचारला नाही. उलट त्यांनी माझे अभिनंदन केले. कौतुक केले. मी मातोश्रीवर दररोज येतो. ठाकरेंचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे असल्या गोष्टींची चर्चा करण्याची गरज नाही. अशा पद्धतीच्या वावड्या कुणी देऊ नयेत. जे घडले नाही, ते घडले असे दाखवण्यात आली. सध्या विकाऊ पत्रकारिता सुरू झाली आहे. हे काही बरे नाही. पत्रकारांनी यावेळी त्यांना तुम्ही उद्धव ठाकरेंशी प्रतारणा करणार नाही असे लिहून घेतल्यासंबंधीचा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, असे काहीही झाले नाही. त्यांनी उत्स्फुर्तपणे विचारले की, तुम्ही असे लिहून देऊ शकता का? त्यावर मी लगेचच हो असे उत्तर दिले. त्यात काहीच विशेष नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. त्यामुळे मी ते लिहून दिले असते. मी ते दिले नसते, तर पुन्हा त्याची बातमी झाली असती. कथित बैठकीला कोणकोणते खासदार होते हजर? प्रस्तुत बातमीनुसार, सदर बैठकीला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे 6 खासदार प्रत्यक्ष हजर होते. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 2 खासदार व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हजर होते. या बैठकीत शिंदेंनी या खासदारांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली. पण नंतर त्यांनी ती फेटाळून लावली. अरविंद सावंत, ओमराजेंनी फेटाळले वृत्त पत्रकारांनी याविषयी ओमराजे निंबाळकर व अरविंद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा केला. काहीही झाले तरी मी शिंदेंसोबत जाणार नाही, असे सावंत यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले. तर ओमराजेंनी मी चुकीच्या बातमीवर स्पष्टीकरण देत बसणार नाही, असे स्पष्ट केले. मी दोन टर्मचा खासदार आहे. माझ्या दोन टर्मपासून हीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे मी चुकीच्या बातमीवर स्पष्टीकरण देणार नाही. अशी कोणती बैठक झाल्याचे मला माहिती नाही. बैठक झाली असेल, तर तिचे बैठक द्यावेत, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर