ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

पुण्यातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारचे कठोर पाऊल:विषारी दारूच्या दुर्घटनांना चाप; राज्यात मिथेनॉलच्या खासगी वितरणावर बंदी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरात २८ मे रोजी मिथेनॉलमिश्रित गावठी दारूचे सेवन केल्याने १५ जणांचा बळी गेला. या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने अखेर कठोर पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. गावठी आणि बनावट दारूमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या मिथेनॉलच्या खासगी वितरणावर राज्यात लवकरच संपूर्ण बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे औपचारिक प्रस्ताव पाठवला आहे. मिथेनॉल (मिथाइल अल्कोहोल) हा पेट्रोलियमजन्य रासायनिक पदार्थ प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी परवानाधारक पद्धतीने विकला जातो. सध्या यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहे. कायद्यानुसार परवान्याशिवाय मिथेनॉलची विक्री किंवा साठा करणे बेकायदेशीर आहे. निर्णायक पाऊल ठरणार वारंवार घडणाऱ्या या जीवघेण्या दुर्घटनांमुळे आता मिथेनॉलच्या खासगी वितरणावर निर्बंध आणण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. राज्य सरकार लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असून विषारी दारूमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी हे पाऊल अत्यंत निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. समित्यांच्या शिफारशी धूळ खात उत्पादन शुल्क विभागाने पाठवलेल्या पत्रात, पूर्वीच्या चौकशी समित्यांच्या शिफारशींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मुंबईतील ‘छाया बार’ दुर्घटनेनंतर स्थापन झालेल्या पार्थसारथी समितीने तसेच २०१५ च्या मालवणी दुर्घटनेनंतर गठित बक्षी समितीने मिथेनॉलची वाहतूक, वितरण आणि विक्री यावर कठोर नियंत्रण आणण्याची शिफारस केली होती. मात्र, आजवर अंमलबजावणी झाली नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर