ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभ येऊन गेला:खुर्ची बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर घणाघाती प्रहार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपवर तसेच फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभ येऊन गेला, शिवसेना ही एकच आहे ती माझी आमची बाळासाहेबांची आहे. त्या उपऱ्याला कळालेले नाही. भाजपला कोणीही अध्यक्ष चालतो हे तो उपरा विसरला. खुर्ची तुझ्या बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात, असा घणाघात ठाकरे यांनी शहा यांच्यावर केला आहे. तसेच नुसता खुंटा लावला आहे, खालीवर काही नाही, असेही ठाकरेंनी यावेळी म्हटले. खासदार झाला नसता तर हमीभाव मिळाला असता का? उद्धव ठाकरे म्हणाले, मिंद्यांना विचारतो की तुमची दाढी वाढते का दाढी देखील भाड्याने घेतली आहे. जागा नसती मिळाली तर झाला असता का खासदार? खासदार झाला नसता तर हमीभाव मिळाला असता का? भाव नसता मिळाला. खायला सुद्धा भाव असायला लागतो. मिंधेला मंत्री आणि आमदार कोणी केले? भाजपने पाठीत वार केला. ही जागा भाजप पुढील निवडणुकीत सोडणार आहे का? जर सोडणार असतील तर त्यांनी आत्ताच जाहीर करावे हा मतदारसंघ आम्ही एकनाथ शिंदे यांना देतो. भाड्याने दाढी, गाडी खुर्ची मिळेल, पण जीवाला जीव देणारी माणसे मिळणार नाहीत. ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरेंनी मतदारांची मागितली माफी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, इथून जर पाहिले तर शिवसैनिक नाही तर पेटलेल्या मशाली दिसत आहे. गद्दार आणि गद्दारांच्या बापांना मी धन्यवाद देतो की तुम्ही या मशाली पुन्हा पेटवल्या. वर्धापन दिनाच्या दिवशी जे बोललो आणि ते मी करणार आहे आणि त्यांची सुरुवात करत आहे. जिथे जिथे गद्दारी झाली तेथे मी जाऊन मतदारांची माफी मागत आहे. शिवसेना आणि मशालीकडे पाहून मतदारांनी निवडून दिले. उमेदवार म्हणून निवडले होते आणि ती चूक म्हणून मी तुमची माफी मागतो. अनेकदा शिवसेना फोडली तोडली. भाजपला गल्लीतले कुत्र विचारत नव्हते तसेच ज्या भाजपला गल्लीतले कुत्र विचारत नव्हते तेव्हा त्याचे बोट धरून मोठे केले. नाही, तर कोणीही विचारत नव्हते. अख्ख्या देशात फक्त दोन खासदार होते. स्वतःचे काहीच नाही, दुसऱ्यांची पोरं चोरून मोठी झालेली पार्टी आहे. काँग्रेसने कधीही शिवसेना चोरण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न केले नाही तो भाजपने केला. ज्यांना लढायचे त्यांनी समोर मैदानात येऊन लढा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर